January 11, 2025

“अपहरण करून हत्या करणारे ४ आरोपी गजाआड; एक महिन्यानंतर खुनाचा उलगडा;  आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी”

1 min read

 

“मृतक मेहतर कुवरसिंग कचलाम यास पैसे परत न केल्याच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने चारचाकी वाहनाने पळवुन नेवुन त्यास मारहाण करुन जिवानीशी ठार केले तसेच मृतकाची मोटरसायकल हिचे चेसीस नंबर घासुन पुरावा नष्ट करुन घटनास्थळावर आणून टाकल्याचे आरोपींनी कबूल केले आहे”

कोरची; (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी;

पैश्याच्या व्यवहारावरून उद्भवलेल्या वादातून चार चाकी वाहनाने अपहरण करून बेदम मारहाण केल्याने मृत झालेल्या व्यक्तीस रस्त्याच्या कडेला फेकून अपघात झाल्याचा देखावा तयार केला होता. सदर घटनेचा कसून तपास केल्यानंतर एक महिन्याने चार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोरची पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवसुन कटेझरी परिसरात ८ जानेवारी २०२३ रोजी एक अनोळखी व्यक्ती रस्त्याच्या कडेला मिळुन आला होता. सदर व्यक्तीला घटनास्थळावरून उचलून ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे उपचारकामी दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी तपासुन त्यास मृत घोषीत केले होते.

कोरची पोलीस स्टेशन येथे सदर घटनेबाबत मर्ग क्र. ०३ / २०२३ दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोउपनि नरेश वाडेवाले करीत होते. मृतकाची ओळख मेहतर कुवरसिंग कचलाम, वय ५५ वर्षे, रा. पौरखेडा, तह. दुर्गकोंदल, जि. कांकेर (छत्तीसगड) याचे असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

हीच ती मोटरसायकल ज्याचा चेसिस नंबर पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयास झाला.

या मर्गबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका असल्याने त्यांनी मर्गबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांना दिले होते. त्यांनी तीव्र गतीने तपासचक्रे फिरवत घटनेचा मागोवा घेतला असता एक महीण्याच्या अथक परिश्रमानंतर क्लिष्ट अश्या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला . सखोल चौकशीअंती ही दुर्घटना मर्ग नसुन, हत्या असल्याचे उघडकीस आले.

मृतक मेहतर कुवरसिंग कचलाम यास पैसे परत न केल्याच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने चारचाकी वाहनाने पळवुन नेवुन त्यास मारहाण करुन जिवानीशी ठार केले तसेच मृतकाची मोटरसायकल हिचे चेसीस नंबर घासुन पुरावा नष्ट करुन घटनास्थळावर आणून टाकल्याचे सांगीतले.

संशयीत आरोपी नामे १) मुकेश बुधरुराम यादव, वय ३६ वर्षे, व्यवसाय फॉरेस्ट गार्ड, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला – चौकी (छत्तीसगड), २) सौरभ राजेंद्र नागवंशी, वय २७ वर्षे, व्यवसाय चालक, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला चौकी (छत्तीसगड), ३) रुपसिंग – बाबुराव तुलावी, वय २७ वर्षे व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. मानपूर – मोहला – चौकी (छत्तीसगड), ४) आसुराम देवजी तुलावी, वय ३६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. – मानपूर – मोहला चौकी (छत्तीसगड) यांनी संगनमत करुन कट रचुन मेहतर कुवरसिंग कचलाम याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मृतक चे कपडे

गडचिरोली पोलीस दलाने वरील आरोपीतांवर पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. १३/२०२३, कलम ३०२, ३६४, १२० (ब), २०१, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केले असुन, त्यांना अटक करण्यात आली व सदर अटक आरोपीतांना न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने चारही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा साहील झरकर हे करीत आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!