December 22, 2024

“गहाणेगाटा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न”

1 min read

कोरची: (प्रतिनिधी); १४ फेब्रुवारी; जलसंवर्धन व मतदार जनजागृतीसाठी युवक’ या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे तालुका मुख्यालयापासून दहा कि मी अंतरावर असलेल्या गट ग्रामपंचयात बोरी अंतर्गत येत असलेल्या मौजा गहाणेगाटा येथे वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची याच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

सात दिवसीय कार्यक्रमाचा समारोप सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोरी गट ग्रामपंचायतचे सरपंच मा. सावजी बोगा होते .प्रमुख अतिथी म्हणून कोरची येथील जेष्ठ पत्रकार मा.नंदुभाऊ वैरागडे, लोकमतचे कोरची तालुका प्रतिनिधी मा.राहुल अंबादे ,दीपक नरडंगे, गहाणेगाटा चे पोलीस पाटील मा भगवानसाय बोगा , वनश्री महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य तथा रा से यो कार्यक्रम अधिकारी मा. डॉ.विनोद .टी. चहारे ,गहाणेगाटाचे प्रतिष्ठित नागरिक मा .तानुरामजी पोरेटी ,गहाणेगाटा येथील जि. प .प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्रीराम गोटा सर ,गहानेगाटाचे ग्रामसभा अध्यक्ष मा.तिलक उईके आदि प्रमुख उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सरपंच मा.सावजी बोगा यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन केले ते म्हणाले की,कष्टाने सर्वकाही मिळते कष्टाशिवाय पर्याय नाही.तुम्ही या शिबिरामध्ये अनेक गोष्टी शिकलात ,त्यांचा वापर करा प्रगत राष्ट्र घडवण्यात युवकांचा खूप मोठा वाटा आहे .प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना नंदूभाऊ वैरागडे म्हणाले की ,तरुणांनी प्रत्येक कार्य आत्मविश्ववाने करावे ,प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता कार्य करावे यश तुमचाच आहे .यावेळी मा.राहुल अंबादे म्हणाले की महापुरुषाचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवन जगा निराशा जाणवणार नाही असेही ते म्हणाले,याचवेळी जि प प्राथ शाळेचे मुख्याध्यापक मा.श्रीराम गोटा समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करत यापुढेही गहाणेगाटा येथे शिबीर घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.व विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले .शिबिरातील निवासी विद्यार्थी रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत नंदेश्वर ,रासेयो विद्यार्थिनी प्रतिनिधी धर्मिन भक्ता,राधिका नैताम,ऋषिकला पुडो,योगेश हलामी यांनी शिबिरातील अनुभव मनोगतातून मांडले.

या सात दिवसीय निवासी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थांना श्रमदान करत असतांना वेळोवेळी सहकार्य करणारे सरपंच मा सावजी बोगा, मा प्रतिष्ठित नागरिक मा.तानुरामजी पोरेटी ,पो.पा.मा.भगवानसाय बोगा, तिलकजी उईके जि प प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक मा. श्रीराम गोटा यांनी विशेष सहकार्य केले म्हणून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता.सात दिवसीय कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवकानी गावात ग्रामस्वच्छता, नाली सफाई,शोषखड्डे, खोदले ,

जलसंवर्धन ,आरोग्य तपासणी शिबीरामध्ये बी.पी.शुगर तपासणी, सिकलसेल माहिती व उपचार ,कॅन्सर माहिती व उपचार , नेत्रचिकित्सा,योगप्राणायाम,नवमतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम,कुटुंब सर्वेक्षण,पशुचिकित्सा शिबिर,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,सोशल मीडियाचे फायदे व दुष्परिणाम,रासेयोतू न व्यक्तिमत्त्व विकास,इ विषयावर मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन, अंधश्रद्धानिर्मुलन,समाजप्रबोध,व्यसनमुक्ती,वृक्षारोपण,तंटामुक्त गाव,निर्मल गाव,हे विषय घेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा कार्यकारी प्राचार्य डॉ. विनोद.टी. चहारे यांनी तर निवासी शिबिराचा अहवाल वाचन प्रा.गुलाब बावनथडे केले आहे.सूत्रसंचालन शिबिरार्थी स्वयंसेवक दीपक हुमने यांनी केले तर आभारप्रदर्शन अंजली बोगा हिने केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मनिष लाडे,प्रा रुखमोडे, प्रा.संजय डोनाडकर, प्रा.रोटके,प्रा.मांडवे यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाला रासेयो शिबिरार्थी व वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील विदयार्थी व गावातील गावकरी मंडळी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!