“जंगल परिसरात नक्षल्यांनी पुरलेले स्फोटक हस्तगत”; “टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई”
1 min read“मिळुन आलेल्या साठ्यामध्ये 2 नग जिवंत ग्रेनेड, 2 नग ग्रेनेड फायर कफ, 18 नग वायर बडं ल, 5 ब्लास्टींग स्टिल डब्बे, 1 प्लॅस्टीक डब्बा (टुल किटसह), 4 नग वायर कटर, 7 नग ग्रेनेड माऊंटींग प्लटे , 1 नग लहान लोखंडी आरी, 20 नग नक्षल पुस्तके, 7 टु-पीन सॉकेट, 1 स्टील डब्बा झाकणी व 2 नग प्लॅस्टी क झिल्ली इ. नक्षल साहीत्याचा समावेश आहे.”
गडचिरोली; (प्रतिनिधी); १४ फेब्रुवारी; नक्षल्यांनी जंगल परिसरात पूरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात आज सकाळी गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार सकाळी 11:30 वा. चे दरम्यान उपविभाग धानोरा अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र कटेझरी हद्दीमध्ये कटेझरी-चारवाही जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले असल्याच्या खात्रीशीर खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाचे जवान व बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जवानांना जंगलात एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहीत्यांचा साठा मिळुन आला.
नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो.
मिळुन आलेल्या स्फोटक साठ्यामध्ये 2 नग जिवंत ग्रेनेड, 2 नग ग्रेनेड फायर कफ, 18 नग वायर बडं ल, 5 ब्लास्टींग स्टिल डब्बे, 1 प्लॅस्टीक डब्बा (टुल किटसह), 4 नग वायर कटर, 7 नग ग्रेनेड माऊंटींग प्लटे , 1 नग लहान लोखंडी आरी, 20 नग नक्षल पुस्तके, 7 टु-पीन सॉकेट, 1 स्टील डब्बा झाकणी व 2 नग प्लॅस्टी क झिल्ली इ. नक्षल साहीत्याचा समावेश आहे.
जंगल परिसरातून हस्तगत करण्यात आलेले 2नग ग्रेनेड हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असून, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन पुढील कारवाई सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस मदात केंद्र कटेझरीच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडलीअसून,पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतकु केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.