December 22, 2024

“राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळेच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे घवघवीत यश”

1 min read

भामरागड, (प्रतिनिधी); १५ फेब्रुवारी: तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील खेळाडू विद्यार्थ्यांनी नाशिक येथे झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध खेळ प्रकारात उत्तम कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले.

आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक येथे १० ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी २६ खेळाडू विद्यार्थ्यांची निवड झाली होती.त्यापैकी १९ विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात उत्तम कामगिरी करीत घवघवीत यश मिळविले.यशस्वी खेळाडू विद्यार्थी-१४ वर्षे वयोगट मुले-आकाश महा-६००मी.धावणे-प्रथम,सुरज दुर्वा -६००मी. द्वीतीय, मुली-रितीका मडावी -६००मी.द्वितीय १७ वर्षे वयोगट मुले -महेंद्र मज्जी-भालाफेक-प्रथम, साईनाथ पुंगाटी १५००मी.-प्रथम,सुखान विडपी १५००मी.-द्वितीय ३०००मी-प्रथम, विलास मट्टामी ८०० मी.-प्रथम,मुली-सदिया मट्टामी १५०० मी.द्वितीय,१९ वर्षे वयोगट मुले, गणेश गोटा-१५०० मी.- द्वितीय,८०० मी.- द्वितीय,मुली- मुन्नी मडावी -१५०० मी.-प्रथम, लक्ष्मी पुंगाटी -१५०० मी.- द्वितीय, चेतना माडकामी-३००० मी.- द्वितीय.तसेच १४ वर्षे मुले-४×१०० मी.रिले- द्वितीय,१७ वर्षे मुली- ४×१००मी.रिले-प्रथम,४×४००मी.रिले-द्वितीय,१७ वर्षे मुले-४×४०० मी.रिले-प्रथम,४×१०० मी.रिले- द्वितीय,१९ वर्षे मुली-४×४०० मी.रिले-प्रथम,४×४००मी.रिले-प्रथम,मुले-४×४०० मी.रिले-प्रथम,४×४०० मी.रिले- द्वितीय.अशा एकूण २६ पैकी १९ खेळाडू विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात घवघवीत यश संपादन केले.जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे,आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे, मुख्याध्यापक श्रीराम झोडे, सर्व शिक्षक व प्रकल्पातील कार्यकर्ते यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व क्रीडा व क्रीडा शिक्षक विवेक दुबे यांचे अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!