“कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ गडचिरोली व त्यांचे अधिनिस्त अभियंता वर पुरडा येथे वन गुन्हा दाखल”; एकास अटक; २८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी.

“ग्राईंडर चालकासह कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ गडचिरोली व त्यांचे अधिनिस्त अभियंता यांचे वर पुरडा येथे वन गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या चालक राजू रविदास यास न्यायालयापुढे हजर केले असता २८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून जिल्हा कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे”
गडचिरोली; (प्रतिनिधी); १७ फेब्रुवारी: पुराडा – मालेवाडा रस्त्याच्या बांधकामात अवैधरित्या खंदे तयार करत असताना वन विभागाने गुन्हा दाखल करत एकाला अटक करून तुरुंगात रवानगी केली आहे. सादर बांधकामामध्ये वापरले जाणारे ग्राइंडर ही यंत्रसामुग्री वन विभागाने ताब्यात घेत जप्त केलेली आहे.
प्राप्त माहितीनुसार देवरी – चिचगड – कोरची – पुराडा – मालेवाडा- येरकड- गोदलवाही- कसनसूर- एटापल्ली रस्ता बांधकाम सुरू आहे. सदर रस्त्याच्या बांधकाम करणे करिता वन विभागाकडून अटी व शर्ती चे अधीन राहून रास्ता बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पूराडा ते मालेवाडा रास्ता बांधकाम मध्ये नियम उल्लंघन करीत रास्ता बांधकाम होत असल्याचे निदर्शनास येताच पुराडा येथील राऊंड ऑफिसर के. व्ही . ढवळे यांनी कार्यवाही करत राजू रविदास वय ३१ वर्ष सह कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ गडचिरोली व त्यांचे अधिनिस्त अभियंता यांचे वर पुरडा येथे वन गुन्हा दाखल करत राजू रविदास यास अटक केली आहे. आरोपीस अटक करून कुरखेडा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात सदर केले असता २८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सदर आरोपीला जिल्हा कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी, पुराडा बालाजी डिघोरे यांचे मार्गदर्शनात राऊंड ऑफिसर के. व्ही. ढवळे हे करत आहेत.