“आज पासून कुरखेडा येथे तीन दिवसीय शिवजन्मोत्सवाची सुरुवात”; “उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिर”
1 min readकुरखेडा, १७ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त कुरखेडा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व समस्त शिवभक्त परिवार यांच्या वतीने यावर्षी तीन दिवसीय शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनी यावर्षी जयंती साजरी केली जाणार आहे.
शिवजन्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी रोज शुक्रवारला या तारखेला सकाळी १० ते १ वाजेपर्यंत कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात “रक्तदान शिबिर” आयोजित केलेले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याची आव्हान मंडळांनी केलेले आहे. स्वच्छते रक्तदान करू इच्छिणाऱ्या रक्तदात्यांनी नाव नोंदणी करिता सागरभाऊ निरंकारी 9405940501, प्रशांत हटवार 8412907093 यांचेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केलेले आहे.