“मालेवाडा जवळ कारचा भीषण अपघात; पुराडा येथील युवक जागीच ठार”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); २२ फेब्रुवारी: मालेवाडा – पुराडा मार्गावर झालेल्या चारचाकी वाहनाच्या दुर्घटनेत एक व्यक्ती जागीच मृत झाला असून कार चकनाचुर झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार पुरदा येथील गितेश्वर तीलक महाजन वय २५ वर्ष मानपुर वरून नातेवाईकांना भेटून वाहन क्रमांक एम एच २९ ए आर ०५२६ ने पुराडाकडे परत येत असताना मालेवाडा पोलिस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या रानवाही गावानजीक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाडावर वाहन आदडलेगेल्याने गाडी अक्षरशः चकणाचुर होवून चालक अडकून राहिल्याने मृत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सदर अपघात रात्री उशिरा झाल्याचे समजते. सादर मार्गावर रहदारी नसल्याने सकाळी सदर घटना लोकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती येथील मालेवाडा पोलिस मदत केंद्रास देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळ गाठून वाहनात अडकून मृत झालेल्या वाहनचालकाला वाहनातून बाहेर काढून शव ताब्यात घेतले उत्तरीय तपासणी करिता पाठविले.
“दोन महिन्यांपूर्वी झाले होते साक्ष्यगंध”
माहितीनुसार मृतक गीतेश्वर महाजन यांचे मानपुर येथील मुलीशी लग्न जुळून दोन महिन्या पूर्वीच साक्ष्यगंध झाले होते. घटनेसलच्या दिवशी गीतेश्वर हा एकटाच मानपुर येथे गेला होता अशी माहिती आहे. नातेवाईकांना भेटून रात्री उशिरा तेथून परत येत असताना काळाने झडप घातली. या रस्त्यावर सहसा वाहतूक रहदारी नसल्याने अपघात झाल्यानंतर कुठीही मदत मिळाली नाही.