“आपदामित्र हल्ला प्रकरणी कुरखेडा पोलिस स्टेशन येथे 2-3 अज्ञात हल्लेखोर विरोधात गुन्हा दाखल”

कुरखेडा पोलिस स्टेशन येथे सुरक्षेच्या दृष्टीने पोहोचलेले आपदामित्र.
कुरखेडा; (प्रतिनिधी);२१ फेब्रुवारी: अरत्तोंडी येथे शिवरात्री निमित्त आयोजित यात्रेत आपदा सेवा देणाऱ्या चमू सोबत काही अज्ञात लोकांनी विवाद करून मारझोड केली होती. यात उशिरा रात्री कुरखेडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेली आपदा मित्र नैतिक मेश्राम द्वारे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद परिस्थिती सक्ष्यानुसर भा द वी ३२३, ३२४, ५०४ , ३४ नुसार अज्ञात २-३ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.

या वर्षी शिवरात्री जत्रे दरम्यान आपदा परिस्थितीशी निपटण्या करिता जिल्ह्यातील निवड झाले प्रशिक्षित आपदा मित्र येथे नियुक्त करण्यात आले होते. १० चे संख्येत असलेल्या आपदा मित्र चामुच्या सोबत काल रात्री ७.३० दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या लोकांनी हल्ला चाढवित जखमी केले होते.
घटनेचा सर्व स्तरावरून निषेध
तालुक्याती पुरातन शिवमंदिर असलेले आस्थेचे देवस्थान म्हणून लोकप्रिय असलेल्या या ठिकाणी दर वर्षी शिवरात्री निमित्त जत्रेचे आयोजन केले जाते. या ठिकाणी जिल्हाभरातून तसेच लगतच्या जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात देव दर्षणाकरिता येथे येतात. येथे येणारे सर्व भक्तांची व्यवस्थित दर्शनाची सोय व्हावी म्हणून येथील ट्रस्ट मंडळ सुद्धा आयोजनाचा बारकाईने व्यवस्थापन करते. येथे सेवा देत असलेल्या आपदा मित्रांना मारझोड करून शिवीगाळ करणाऱ्यांचा ट्रस्ट व क्षेत्रातील लोकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.