December 22, 2024

“22 व 23 फेब्रुवारीला धानोरा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन”

1 min read

गडचिरोली,(प्रतिनिधी) 20 फेब्रुवारी: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक ‍ प्रशिक्षण संस्था, धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2023 रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, धानोरा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये एस. आय. एस. हैद्राबाद आणि एम 1 सेक्यूरीटी & अलाइड सर्व्हिसेस प्रा.लि.नागपूर या कंपनी उपस्थित असणारअसून सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दि. 22 व 23 फेब्रुवारी 2023 रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, धानोरा येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने केले आहे.

About The Author

error: Content is protected !!