April 26, 2025

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या टेलिव्हिजन विभागाची राज्य कार्यकारिणीची घोषणा; कार्याध्यक्षपदी “संदीप भुजबळ”, “पंकज दळवी” यांची निवड.

मार्चमध्ये कृतिशील कार्यासाठी बैठक, सर्व जिल्हा अध्यक्षांची निवड येत्या आठ दिवसांत

मुंबई (प्रतिनिधी)  २५ फेब्रुवारी: देशात तेवीस राज्यांत १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन देश पातळीवरील काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या टेलिव्हिजन विभागाच्या पत्रकारांची राज्य कार्यकारिणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या टेलिव्हिजन विभागाचे प्रदेशाध्यक्ष विलास बडे यांनी जाहीर केली. राज्यात टीव्ही पत्रकार आणि टीव्ही पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या संबंधित सर्वांच्या प्रश्नावर कृतिशील कार्यक्रम ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने आखला आहे, असे विलास बडे यांनी यावेळी सांगितले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या टेलिव्हिजन विभागाचे प्रदेशाध्यक्ष विलास बडे यांनी घोषित केलेल्या राज्य कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी संदीप भुजबळ,पंकज दळवी ,उपाध्यक्षपदी निशांत भद्रेश्वर , ऋत्विक भालेकर,अक्षय कुडकेलवार, दत्ता कानवटे
सरचिटणीस विजय गायकवाड , सहसरचिटणीस गोविंद वाकडे ,खजिनदार /कोषाध्यक्ष शैलेश तवटे , कार्यवाहक उमेश अलोने, कार्यवाहक राजू सोनवणे ,संघटक दीपरत्न निलंगेकर,संघटक अक्षय भाटकर ,संघटक सागर सुरवसे ,संघटक गणेश काळे,प्रवक्ता महेश तिवारी ,प्रसिद्धी प्रमुख निकिता पाटील , सदस्यपदी कपील भास्कर,गौरव मालक,कुंडलिक काळढोके यांचा समावेश आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून राज्यभरातील टेलिव्हिजन माध्यमांत काम करणाऱ्या सर्वांसाठी आम्ही काम करीत आहोत. येत्या दहा दिवसांत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष घोषित केले जाणार आहेत. राज्याचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांची राज्य चिंतन बैठक येत्या मार्चमध्ये आयोजित केली जाणार आहे. टीव्हीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या भविष्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून एक पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. त्या पॉलिसीच्या माध्यमातून शासन आणि राज्यातल्या टीव्हीचे प्रशासन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी नियमावली ठरवून दिली जाणार आहे. याशिवाय ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकारांसाठी घर, आरोग्य, मुलांचे शिक्षण, स्कीलिंग आणि सेवानिवृत्तीनंतर काय, या पंचसूत्रीवरही काम केले जाणार असल्याची माहिती विलास बडे यांनी दिली.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी नवीन सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!