“व्हाईस ऑफ मिडीया संघटनेत इलेक्ट्रॉनिक मिडीया विभागाच्या राज्य प्रवक्तेपदी ‘महेश तिवारी'”
1 min readगडचिरोली;(प्रतिनिधी);२५फेब्रुवरी: गडचिरोली जिल्ह्याचे धडाडीचे लोकप्रिय सर्वपरिचित सिरोंचा येथील वरिष्ठ पत्रकार महेश तिवारी यांना व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
व्हाईस आफ मिडीयाच्या टेलीविजन विभागाच्या ( इलेक्ट्रॉनिक मिडीया) राज्य प्रवक्ता पदावर गेली 22 वर्ष इलेक्ट्रॉनिक मिडीयात काम करणारे जेष्ट पत्रकार महेशभाऊ तिवारी यांची राज्य प्रवक्ता पदावर नियुक्ती करण्यात आल्याने गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुद्दमवार यांनी विशेष आभार व्यक्त करत आनंद व्यक्त केला आहे. या वाईस आफ मिडीयाच्या टेलीविजन विभागाच्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विलास बढे यांनी आज जाहीर केलेल्या कार्यकारिणीत ही नियुक्ती केली असून..वाईस आफ मिडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी अभिनंदन केले आहे