“दुधमाळा काकडेली येथे सखी वन स्टॉप तर्फे जनजागृती कार्यक्रम संपन्न”
1 min readगडचिरोली,(प्रतिनिधी) १ मार्च: उपकेंद्र दुधमाळा अंतर्गत काकडेली येथे सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोली तर्फे जनजागृती कार्यकम घेण्यात आले.
जनजागृती कार्यक्रमात उपस्थीत मान्यावर डॉ. मौशन्ती नंदेश्वर व जिल्हा परिषद मुख्याध्यापिका मंजुशा पोरड्डीवार उपस्थीत होते. तसेच मार्गदर्शक म्हणून कु. प्रणाली बळवंत सुर्वे व लोमेश जिवनदास गेडाम यांनी महिला व बालकाना मार्गदर्शन केले.
केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास अंतर्गत येणारी सखी – वन स्टॉप सेंटर ही एक पिडीत महिलांना व मुलीना आधार व एका छताखाली अनेक सेवा याप्रमाणे पोलीस सेवा, कायदेशिर मदत व समुपदेशक, आरोग्य सेवा, निवासी सुविधा, मनोरंजन सेवा कायदेविषयक मार्गदर्शन केले जातात.
मार्गदर्शन करतांना वन स्टॉन सेंटर बद्दल माहिती व महिलांवर होणाऱ्या अत्याचार कशामुळे होतात हे सांगण्यात आले व वन स्टॉप सेंटर व्दारा पुरविण्यात येणाऱ्या सेवा तसेच अडचणीत सापडलेल्या तसचे कौटुंबिक संघर्षातील पिडीत महिलांना व त्याच्या बालकांना अन्न, वस्त्र, निवारा व वैद्यकीय मदत कायदेशिर समुपदेशन तसेच हेल्पलाइन क्रमांक 181, 112, 1098, 1091, 155209 या व्दारे महिलांना मार्गदर्शन व मदत करण्यात येते.
जनजागृती कार्यक्रमाची संगता म्हणून सिस्टर सिडाम व सिस्टर पंचभाई यांनी आभार प्रदर्शन केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी सहाकर्य केले.