“कुरखेडा नगरपंचायतचे प्रशासन अधिकारी “प्रवीण गिरमे” झाले प्रथम श्रेणी अधिकारी”
1 min read“एम पी एस सी २०२१ परीक्षेत ईमाप्र प्रवर्गत २३वी रँक, राज्यातून ८५ रँक”; कुरखेडा नगर पंचायत येथे सेवारत अस्तांना प्रथम श्रेणी अधिकारी होणारे तिसरे अधिकारी”
कुरखेडा; (प्रतिनिधी); २ मार्च: कुरखेडा नगरपंचायत येथे कार्यरत प्रशासन अधिकारी श्री.प्रवीण गिरमे यांची नुकत्याच घोषित झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत (एम पी एस सी) उत्तीर्ण होवून प्रावीण्य मिळवून प्रथम श्रेणी अधिकारी होण्याचा बहुमान मिळविलेला आहे.
नुकत्याच घोषित झालेल्या एम पी एस सी 2021 चे परीक्षेत राज्यस्तरावर 85 क्रमांक रँक मिळवली असून ओ. बी. सी. या प्रवर्गात 23 रँक प्राप्त झाली आहे. एकूण 405 पदाकरीता झालेल्या या परीक्षेत 25 पद हे ओ. बी. सी. प्रवर्ग करिता आरक्षित होते. यात 23 वी रँक प्राप्त झाल्याने त्यांचे पहिल्याच यादीत अधिकारी होणे निश्चित झाले आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग द्वारे झालेला या परीक्षेत उपजिल्हा अधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक आयुक्त जी एस टी, सहायक कामगार आयुक्त, संवर्ग विकास अधिकारी इत्यादी प्रथम श्रेणी अधिकारी करिता ही परीक्षा आयोजित केली होती. सध्या कॅडर निवड निश्चित झाली नसली तरी श्री. प्रवीण गिरमे यांनी सहायक आयुक्त जी.एस.टी. या कॅडर ला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
नगर पंचायत कुरखेडा येथे कर्तव्यावर असताना प्रथम श्रेणी अधिकारी होणारे श्री. गिरमे हे तिसरे अधिकारी आहेत. या पूर्वी मुख्याधिकारी श्री. मयूर भुजबळ हे उपविभागीय पोलिस अधिकारी व श्रीमती नमिता बांगर ह्या संवर्ग विकास अधिकारी म्हणून निवड होवून प्रथम श्रेणी अधिकारी झालेले आहेत.
येथील कुरखेडा सिटिझन फोरमचे नसीर हाशमी व सदस्यांच्या वतीने प्रवीण गिरमे यांचे अभिनंदन करून जीवनातील नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.