December 23, 2024

“जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण”

1 min read

गडचिरोली,(प्रतिनिधी); ४ मार्च; आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोली च्या वतीने जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD ) असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.1000 ( एक हजार रुपये ) विदयावेतन दिले जाईल. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत.तसेच अर्ज दिनांक 26/03/2023 पर्यत या कार्यालयात सादर करावेत तदनंतर मुलाखत दिनांक 27/03/2023 रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्या करीता उपस्थिलत राहावे अधिक माहीतीसाठी कार्यालयाच्या 07132-295143 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकाररी यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!