“कूरखेडा येथील शिक्षक पतसंस्थेचा निवडणूकीत दोन गटात चूरस”
1 min readकूरखेडा;(प्रतिनिधी); ५ मार्च: प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कूरखेडा/कोरची ची सार्वत्रिक निवडणूकीची मतदान प्रक्रीया आज रविवार रोजी सकाळी ८ ते सांयकाळी ४ वाजे दरम्यान शांततेत येथील जिल्हा परिषद शाळेचा इमारतीत पार पडली. यावेळी शिक्षकांचा दोन गटात मोठी चूरस असल्याचे दिसून आले.
येथील पतसंस्थेचा १५ सदस्यीय संचालक मंडळाकरीता असलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत विद्यमान सत्ताधारी प्राथमीक शिक्षक समीती व प्राथमिक शिक्षक समन्वय परिवर्तन पॅनल समोरा समोर टाकल्याने निवडणूकीत मोठी चूरस निर्माण झाली होती. मागील पंधरा दिवसा पासून दोन्ही गटानी कूरखेडा व कोरची तालूक्यात प्रचाराचा धूराळा उडाला होता. एकूण १५ संचालक मंडळाचा निवडणूकीत दोन्ही गटाकडून प्रत्येकी १५ व ३ अपक्ष असे एकूण ३३ उमेदवार भाग्य आजमावत होते. येथे एकूण ६४० मतदार संख्या असून त्यापैकी ६२९ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली यावेळी मतदान केंन्द्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून येथील सहकार अधिकारी ग्रेड १ सूशील वानखेड़े यानी जबाबदारी पार पाडली. मतमोजणी प्रक्रीया आजच सांयकाळी सूरू करण्यात येणार आहे. मात्र मतदान बायलेट पेपर वर घेण्यात आल्याने व ही मतमोजणी प्रक्रीया कीचकट असल्याने अंतीम निकाल मध्यरात्रि चा नंतरच स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.