December 23, 2024

“जिल्हा प्रशासनाच्या कॉपी मुक्त अभियानाला कुरखेडा येथे खो; चक्क कॉपी करू देणे करिता केंद्र प्रमुखाने उकळले पैसे; घटनेचा व्हिडियो व्हायरल”

1 min read

“प्राध्यापकास वाचविण्यासाठी सर्वस्तरातून धडपड”;”राजनीतिक दबाव टाकून सदर गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू”

कुरखेडा; (प्रतिनिधी): 8 मार्च;

एकीकडे प्रशासन कॉपीमुक्त परीक्षा घेण्या करिता परीक्षा केंद्र परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून बाहेरून कुणालाही परीक्षा केंद्रात कॉपी पुरवू देत नाही आहे. त्यातच आता परीक्षा केंद्र प्रमुख या बाबीचा फायदा घेत कॉपी करायची सुट पाहिजे असल्यास पैसे मोजावे लागते असे म्हणत कित्येक परिक्षर्धी कडून पैसे उकडल्याची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे.

येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी कक्षेचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर परीक्षा प्रमुख असलेल्या येथीलच एका प्राध्यापकाने केंद्रात कॉपी करू देणे करिता मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केल्याची बाब समोर आली आहे.

येथील काही परीक्षार्थींनी सदर केंद प्रमुखास पैसे देत चक्क व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे. ही बाब लक्षात येताच सदर परीक्षा केंद्र प्रमुख येथील एक राजकीय पुढाऱ्यांच्या शरणी गेला असून. प्रकरण दडपण्यासाठी सदर विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांना सदर व्हिडिओ मोबाईल मधून डिलीट करण्यास जबरदस्ती करून व्हिडिओ डिलीट करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सदर व्हिडिओ व्हायरल होवून गडचिरोली न्यूज नेटवर्क च्या हाती लागल्याने या प्रकरणाला वाच्यता फुटली आहे. सदर व्हायरल व्हिडिओ मध्ये येथील परीक्षा केंद्र प्रमुख विद्यार्थ्यांकडून ५०० – ५०० च्या नोटा रोख रक्कम स्वीकारून त्यांची रोल नंबर लिहितांना दिसत आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर असल्याचे चित्र आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्याचे लक्षात येताच सदर प्रकरणात आपले वर कार्यवाही होणे निश्चित असल्याचे समजताच सदर परीक्षा केंद्र प्रमुखाने १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर काही विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क भरणे करिता पैसे उसने घेलतले होते व ते परत करत असल्याचे लिहून घेतले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. पण व्हिडिओ मध्ये सदर प्राध्यापकाला पैसे देताना दिसणारे मुलं हे दुसऱ्या शाळेचे असून त्यांचा आणि या प्राध्यापकांचा संबंध कसा? आणि त्यांनी शाळेतील मुलं नसतांना सुद्धा यांना पैसे कधी दिले? स्वतःला वाचविण्यासाठी केला बनाव त्यांच्याच अलट येणार आहे. आपल्या मोबाईल मधून राजनीतिक दबाव टाकून व्हिडिओ सदर मुलांच्या मोबाईल मधून डिलीट करून घेतला. परंतु सदर प्राध्यापकाने लिहून घेतलेला स्टॅम्प पेपर न फाडल्याने पैसे देणाऱ्या विद्यार्थी मध्ये कुजबुज सुरू आहे.

एवढे गंभीर प्रकरण असताना सुद्धा राजकीय हस्तक्षेप मुळे सदर परीक्षा प्रमुख ची हिम्मत अधिक वाढली असून माझा कोण काय वाकडे करते ह्या भावनेने वावरत असल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणात योग्य चौकशी करून कॉपी करिता पैसे उकळणाऱ्या केंद्र प्रमुखावर कार्यवाही करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.

 

About The Author

error: Content is protected !!