“गेवर्धा वन परिक्षेत्रात हरणीची शिकार; एकास अटक”
1 min read“क्षेत्र सहायक एस. जी. झोडगे यांचे नेतृत्वात जंगल परिसरात गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने सदर कार्यवाही केली आहे”
कुरखेडा;(प्रतिनिधी); ०७ मार्च: गेवर्धा वनपरिक्षेत्र मध्य रात्र च्या सुमारास विद्युत प्रवाह सोडून हरणीची शिकार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून घटना स्थळावरून एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहिती नुसार गेवर्धा राखीव वन खंडन १३३ मध्ये
वन विभागाचे पथक गस्तीवर होते. दरम्यान रात्री ११.३० चे सुमारास ३३ केवी विद्युत वाहिनी ट्रीप झाली. महाराष्ट्र विद्युत वितरण विभाग कुरखेडाचे पथक लाईन दुरुस्ती करिता गेवर्धा वन परिक्षेत्रात दाखल झाले. या महावितरण च्या पथकासोबत वन विभागाचे पथक ही जंगलातच होते. लाईन मधील बिघाड दुरुस्ती दरम्यान रात्रौ २ वाजता दरम्यान तारेवर आकोडा टाकून वीजप्रवाह सोडून शिकार झाल्याची बाब गस्तीवर असलेल्या येथील वनविभागाच्या पथकाच्या लक्षात आली. घटनेची पाहणी करून वीज प्रवाह सुरळीत झाला. पण घटना स्थळी कोणी उपस्थित नव्हता. ज्याने शिकारी करिता सदर प्रकार केला आहे तो येथे परत येईल व त्याला पकडता येईल या उद्देशाने वन विभागाचे पथक पाडत ठेवून होते. सकाळी ४ वाजता दरम्यान टॉर्च घेवून कोणी तरी जंगल परिसरात घटना स्थळाकडे येत असल्याचे दिसले. वन विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने आडोपा घेत लक्ष ठेवलं. गेवर्धा येथील महादेव धोंडू तुलावी वय ६० वर्ष शिकार झालेल्या हरीण जवळ आल व पाहणी करत होता. अडोपा घेत पाडत ठेवणाऱ्या वन विभाच्या पथकाने त्याला ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला.
वन्य जीव संरक्षण कायद्या खाली सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
वन विभाग कडून झालेली सदर कार्यवाही एस. जी. झोडगे
क्षेत्र सहायक गेवर्धा यांचे नेतृत्वात कू. एस. डी. लेखामी वन रक्षक गेवार्धा, एस. वी. पिलारे वन रक्षक खेडेगाव,
वी. बी. पावडे वन रक्षक गुरनोली, वी एल हतमोडे वन रक्षक खैरिटोला, वन मजूर अरुण डोंगरवार, प्रभू गायकवाड, हरी नैताम, मनोज वालदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
विद्युत वाहिनी दुरुस्ती करिता आलेल्या महावितरण विभागाच्या चमू ने सदर शिकारी करिता प्रवाहित केला विद्युत प्रवाह काढून देण्यास सहकार्य केले. महावितरणच्या चमूत अनील बागमारे, संदीप क्षीरसागर, गोपाळ बनकर, पवान बोरकुटे हे उपस्थित होते.
“आरोपी तिसऱ्यांदा शिकार प्रकरणात अडकला”
गेवर्धा येथील हरणीच्या शिकार प्रकरणात अडकलेला महादेव धोंडू तुलावी हा आरोपी या पूर्वी ही दोन वेळा शिकार करतांना पकडलागेला आहे. सदर प्रकरणात सबळ पुरावा अभावी तो सुटला होता. त्याने या पूर्वी अनेकदा जंगली प्राण्यांचे शिकार केले असल्याचे बोलले जात आहे.