December 23, 2024

“राजर्षी शाहू संस्थेकडून एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार”

1 min read

आनंद दहागावकर, अहेरी; १० मार्च: जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था आलापल्ली द्वारा संचालित लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अहेरी येथे महाराष्ट्र लोक सेवा आयोग ची परीक्षा उत्तीर्ण करुण अहेरी शहराचे नाव लौकिक करनारे विद्यार्थी कु हर्षल पोलशेट्टी वार, आदित्य सड़मेक यांचा सत्कार करण्यात आला। त्यासोबत डॉक्टर सुहासिनी बोधे हीचा पन सत्कार करण्यात आला। एमपीएससी द्वारा घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक व सहाययक कक्षाधिकारी ची परीक्षा हर्षल नी उत्तीर्ण केली असुन दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क ची परीक्षा आदित्य ने उत्तीर्ण केली। त्याच बरोबर कु सुहासिनी बोधे बिडीएस झाल्याबद्दल महिला दिनाचे औचित्य साधून संस्था मार्फत सत्कार करण्यात आला।याप्रसंगी संस्था अध्यक्ष गिरीश मद्देर्लावार व लक्ष्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे शिक्षक विनोद दहागावकर,सतीश पनकंटीवार,शुभम नीलम, धर्मराव कृषि विद्यालय चे गणित शिक्षक आतिश दोतुलवार यांच्या हस्ते सर्व उत्तीर्ण झालेल्य विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला।यप्रसंगी हर्षल पोलशेट्टीवार व आदित्य सडमेक यानी अभ्यास कसा करावा व वेडेचे नियोजन,ध्येय गाठायला काय करावे लागते यावर सविस्तर मार्गदर्शन केले आनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान केले, डॉ सुहासिनी यानी आरोग्य कसे चांगले ठेवून अभ्यास करावा यावर मार्गदर्शन केले।यप्रसंगी संस्था अध्यक्ष गिरीश मद्देर्लावार यांच्या सह,प्रमुख पाहुणे आतिश दोतुलवार,एडवोकेट पंकज दहागावकर यानी मनोगत मांडले कार्यक्रमाचे प्रस्ताविक अश्विन मडावी व सूत्रसंचालन विद्यानी कोसरे हीने केले.

About The Author

error: Content is protected !!