“‘कॉलेज टू कॉर्पोरेट’ या विषयावर एकदिवसीय सेमिनारचे आयोजन”
1 min readआनंद दहागावकर; अहेरी; 10 मार्च: स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालय, अहेरी येथे ‘कॉलेज टू कॉर्पोरेट’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र दि. 09 मार्च 2023 रोजी कॉलेजच्या ‘इंग्रजी विभाग’ आणि ‘करिअर मार्गदर्शन कक्षाच्या’ संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
हे सेमिनार व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुरेश पंदिलवार यांनी मार्गदर्शन केले. डॉ सुरेश पंदिलवार सध्या इंडोरामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड, नागपूर येथे उपमहाव्यवस्थापक (HR) या पदावर कार्यरत आहेत. ते एक प्रसिद्ध एचआर ट्रेनर देखील आहेत. त्यानी अनेक कॉर्पोरेट अधिकारी आणि कामगारांना प्रशिक्षण दिलेले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला कसे घडवावे याविषयी त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाचा एस.बी.कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रवींद्र हजारे (इंग्रजी विभाग प्रमुख) व प्रभारी प्राचार्य पी.व्ही. घोडेस्वार (संयोजक व करिअर मार्गदर्शन कक्षाचे प्रभारी) यांनी केले. कार्यक्रमास प्रा. सी. एन. गौरकार, प्रा. सुहास मेश्राम, प्रा. गौरव तेलंग, प्रा. नामदेव पेंदाम, प्रा. सुनील गलबले, प्रा. रूपा घोनमोडे, प्रा. पूजा मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमास सुमारे 60 विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली होती.