April 25, 2025

“नक्षलवाद्यांनी निरपराध आदिवासींची हत्त्या थांबवावी” -सुरेश पद्मशाली

गडचिरोली; (प्रतिनिधि); १० मार्च- नक्षलवाद्यांनी निरपराध आदिवासींची हत्त्या थांबवावी असे आवाहन जेष्ठ पत्रकार व जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी केले आहे.
भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावात पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी साईनाथ नरोटे या २६ वर्षीय युवकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना दिनांक ९ मार्च गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. साईनाथ हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता तो होळीनिमीत्त मर्दहुरला आपल्या स्वगावी आला होता. आदिवासी समाजातील युवक उच्च शिक्षण घेऊन व स्पर्धा परीक्षांमध्ये बसून चांगले अधिकारपदाची नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असतांना नक्षलवाद्यांनी तो पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरून हत्त्या करणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे.
तेन्दुपत्ता तोडण्याचा मोसम येताच दरवर्षी नक्षलवादी हिंसक वातावरण निर्माण करून तेन्दुपत्ता ठेकेदारांकडून खंडणी वसूल करतात हा दरवर्षी चा कार्यक्रम आहे. पोलिस विभागांनी नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी कारवाई करावी व आदिवासींचे रक्षण करावे अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!