December 23, 2024

“तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा विरोधात १३ मार्च २०२३ पासून कुरखेडा येथे आमरण उपोषण”

1 min read

“वारंवार निवेदन देवून जिल्हा प्रशासन कुठलीही कार्यवाही न करता अवैध उपसा करणाऱ्यांचे पाठराखण करत असून या अवैध उपस्या मुळे पर्यावरण व लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे”

कुरखेडा; (प्रतिनिधी); १० मार्च: तालुक्यातील कुंभिटोला येथील अवैध विटाभट्टी , अवैध रेती उपसा सारख्या गंभीर समस्या व तालुक्यातील अवैध गौण उत्खनन करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणी करिता निवेदने सादर करून कंटाळलेल्या गावकऱ्यांनी आता उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. येत्या १३ मार्च २०२३ पासून कुरखेडा येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा निवेदन येथे सदर केलेला आहे.
कुंभीटोला या गावालगत व नदी किनारी सुरू असलेल्या विटा भट्टी गावा पासून व नदी किनाऱ्या पासून ५०० मीटर दूर अंतरावर करण्यासाठी निर्बंध घालणे बाबत येथील तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक १६ जानेवारीला २०२३ ला निवेदन सादर केले होते. कुंभिटोला या गावाच्या ५०० मीटर परिसरात विटा भट्टी लावल्याने विटा भट्टी मधील राखड हवेने गावात उडून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच नदी किनाऱ्याला लागूनच विटा भट्टी करिता उत्खनन केल्याने पुराचे पाणी गावाकडे येत आहे. तरी सदर कुंभीटोला गाव लगतच्या विटा भट्टी धारकांना गाव व नदी किनाऱ्या पासून ५०० मीटर दूर अंतरावर खोदकाम करणेस निर्बंध घालण्यात यावे करिता समस्त कुंभिटोला येथील नागरिक निवेदन सादर केले आहे, परंतु जिल्हा स्तरावरून काहीच कार्यवाही झाली नाही.
कुंभिटोला हे गाव महसूल दप्तरी पूरग्रस्त नोंद असून दरवर्षी पुराचा फटका या गावाला बरसत असतो. सदर गावाच्या नजीक असलेल्या सती नदीपासून अगदी जवळच मोठ्या प्रमाणात विटाभट्टीसाठी अवैध माती उत्खनन केले जाते. सदर उत्खनन केल्यामुळे नदीचा प्रवाह बदलून गावाकडे वाढण्याची दाट शक्यता असून गावाच्या अस्तित्वास धोका निर्माण होवून भविष्यात मोठे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. सदर विषयाचा गांभीर्याने अवलोकन करून नदी किनारी व गावालगत असलेल्या भट्टी धारकांना विटा टाकण्यात करिता परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती या निवेदन द्वारे करण्यात आली होती. परंतु गावकऱ्यांच्या वाजवी मागणीला केराची टोपली दाखवली जात आहे. या ठिकाणी विटा भट्ट्या लावण्यास प्रतिबंध करा अशी मागणी करून सुद्धा दिनांक ०१/०३/२०२३ रोजी ग्रामपंचायत कुंभीटोला कार्यालयास २०/०२/२०२३ चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुदत बाह्य जाहीरनामा प्रसिध्द करून गावकऱ्यांना आक्षेप नोंदविण्या पासून रोखण्याचा व अवैध विटा धारकांना भट्ट्या लावून नंतर परवानग्या देण्याचा प्रकार प्रशासनिक स्तरावरून होत आहे. त्याच प्रमाणे कुंभीटोला नदी पत्रातून अवैध रेती उपसा होत असल्याची तक्रार दिनांक २७/०२/२०२३ रोजी सादर करून ही कुठीलीही प्रकारची साधी चौकशी ही करण्यात आलेली नाही. ज्या ठिकाणावरून रेती उपसा करण्याचा सातबारावर परवाना सदर रेती मालकाला मिळालेला आहे, तिथून उपसा न करता इतरत्र ठिकाणावरून उपसा होत आहे. ज्या सातबारावर रेती उपसा करण्याचा परवाना दिला आहे त्याचे यापूर्वीच इंपिक पाहणी केली असून उत्पन्नही दाखवले व धान विक्री केली आहे.
2021 साला पासून ते 2023 पर्यंत ज्या सर्व्हे क्रमांक 23 चा उपयोग करून पूर्ण शेती पीक पेरणी दाखवून धान विक्री करून पैसे उचल केलेली आहे. ती शेतीचे 23 क्रमांक चे सर्व्हे नंबर पाडीत कसे? असा सवाल ही उपस्थित केला जात आहे. तलाठी कडून बनावट हस्तलिखित ७/१२ तयार करून घेत पडीत जमीन दाखवून शेती मधून रेती काढण्याचा बनाव करून सती नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल केली आहे. बनावट ७/१२ वर रेती उपसा करण्याचा परवाना कसा मिळाला ? हा संशोधनाचा विषय असून रेतीचा उपसा हा दिलेल्या वेळेनुसार ही होत नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
याबाबत महसूल प्रशासनाकडे माहिती दिली असता संबंधित प्रकाराकडे कानाडोळा करण्यात येत आहे. एकंदरीत सर्व प्रकार हा अवैध असल्याचे निष्पन्न होत असून सदर प्रकरणाची उचित चौकशी करून प्रकरणातील संबंधित दोषींवर कारवाई करून गावकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा अशी मागणी सादर केलेली आहे.
परंतु आज दिनांक पर्यंत आपल्या स्तरावरून कोणतीच सकारात्मक कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकशाही पद्धतीने उपोषण करून प्रशासनास येथील समस्येचे गांभीर्य लक्षात आणून देणे करिता कुरखेडा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार गावकऱ्यांनी घेतलेला आहे. येत्या १३ मार्च २०२३ पासून तहसील कार्यालय कुरखेडा समोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत.
“तूर्तास उपोषण स्तागित करून चौकशी करिता वेळ देण्याचा येथील तहसील कार्यालयाचा उपोषणकर्त्यांना विनवणी पत्र”
गेल्या महिन्याभरापासून निवेदनाला केराची टोपली दाखवणाऱ्या तहसील कार्यालयाने उपोषणाचा अर्ज प्राप्त होतास चौकशीसाठी पत्र काढल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच उपोषण करताना तूर्तास उपोषण स्थगित करण्याची विनवणी आता तहसील कार्यालयाकडून होत असल्याची माहिती आहे. आज उपोषणकर्त्यांना दिलेल्या पत्रात सदर प्रकरणात आपण चौकशी करू असा आश्वासन देणारा व तूर्तास उपोषण करू नका अशी विनवणी करणारा पत्र प्राप्त झाला आहे. एकंदरीत आपण हे सर्व प्रकरणांमध्ये अडकले जाणार ही कल्पना येताच येथील तलाठी वैद्यकीय रजेवर गेल्याचेही बोलले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!