December 23, 2024

“16 तास वीज मागणीसाठी 15 मार्च ला आम आदमी पक्षाचा चक्का जाम आंदोलन”

1 min read

कुरखेडा; (प्रतिनिधी); ११ मार्च: शेती पंप करिता दिला जाणारा ८ तासाचा विद्युत पुरवठा वाढवून 16 तास करावे अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरू शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल असा निवेदन सदर करून शासनास इशारा दिला होता.

शासन स्तरावरून कुठलेही पाऊल शेतकऱ्यांच्या हितासाठी उचलण्यात न आल्याने येत्या १५ मार्च २०२३ ला गेवर्धा येथे गुरनोली फाट्या जवळ सकाळी ११ वाजता पासून रस्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करणार असल्याचं पत्र येथील तहसीलदार व पोलीस थाना प्रमुख यांना सादर केलेला आहे.
कूरखेडा तालुक्यात दिला जाणार कृषी विद्युत पुरवठा केवळ आठ तास दिला जात आहे. यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेत पिके करपण्याच्या परिस्थितीवर आहे. सदर ८ तासाचा विद्युत पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागेल. यापूर्वी 12 तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले, परंतु मागील एक महिन्यापासून कृषी जोडणी असलेल्या विद्युत पंपांना केवळ ८ तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याची स्थितीत आले असून या विषयावर तत्काळ निर्णय घेऊन सदर वीज पुरवठा १६ तास न केल्यास शेतकरी पीक हातातून निघून जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उद्योग नसलेल्या जिल्हा व मागासलेली स्थिती असलेल्या या भागात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन आहे. त्यातच वीजपुरवठा केवळ ८ तास झाल्यास शेती कशी पिकवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा थाटला आहे.
सदर अन्यायपूर्ण बाबीचा पुनर्विचार करावा व शेती करिता १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा या मागणी करिता व शेतकऱ्यावर होणाऱ्या या अन्याय विरोधात आम आदमी पार्टीने शेतकरी हितार्थ रस्त्यावर उतरून १५ मार्चला आंदोलन उभा करणार आहे.

About The Author

error: Content is protected !!