“पुढील तीन दिवसात गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी गर्जनेसह पाऊस पडण्याची हवामान खात्याची चेतावणी”
1 min readगडचिरोली; (प्रतिनिधी); १२ मार्च: हवामान खात्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या हवामान अंदाजाच्या चेतावणी नुसार जिल्ह्यात काही ठिकाणी 14 ते 16 मार्चला दरम्यान गरजेनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम होऊन येत्या तीन दिवसांमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
या दरम्यान गर्जनेसह होणाऱ्या पावसा सोबतच ३०-४० प्रति तास तीव्र वेगाने वारे चालणार असल्याची चेतावणी ही हवामन खात्याने दिलेली आहे.