“घरातच गळफास लावलेल्या स्थितीत आढळली नवविवाहिता; “मुलीच्या वडिलांनी हुंड्या करिता छड केल्याचा आरोप करत दाखल केली संपूर्ण कुटुंब विरोधात पोलिसात तक्रार”

कुरखेडा; (प्रतिनिधी); १३ मार्च: तालुक्यातील खरकाडा येथे काल सकाळी ९ वाजताच्या सुमारास राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थिती महिला आढळली होती. मृतक हर्षदा महेश बनसोड 23 वर्ष असल्याची माहिती आहे. तिचा हुंड्या करिता छड करून आत्महत्येस प्रेरित केल्याची तक्रार मुली वडील कडून कुरखेडा पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आल्याची माहिती आहे.
सविस्तर असे की, वडसा तालुक्यातील बोळधा येथील हर्षदा प्रल्हाद गायकवाड हीचा विवाह 19 एप्रिल 2022 रोजी खरकाडा निवासी महेश बाबुराव बनसोड यांचेशी झालेला होता. घटनेच्या आदल्या रात्री हर्षदाने घरी बोळधा येथे घेवून जाण्यासाठी वडिलांना फोन केला होता. मुलीला घरी घेवून येण्या पूर्वीच दुसऱ्याच दिवशी सकाळीच मुलीच्या मृत्यूची बातमी पोहचली. नवीन संसाराचे वर्षपूर्ती होण्या पूर्वीच हर्षदाने जीवन यात्रा संपवली असल्याची बातमी ऐकून काळजाचा ठोका चुकलेले गायकवाड कुटुंब खरकाडा येथे पोहोचले. मुलीला फासावरून खाली उतरवून पोलिस घटना पंचनामा करत होते. पंचनामा झाल्या नंतर उत्तरीय तपासणी करिता कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे शव नेण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसांना मुलीच्या वडिलांनी कुरखेडा येथे शवविच्छेदन करण्यास विरोध करत वडसा येथे शवविच्छेदन करण्याचा हट्ट धरला.
खारकडा येथील मुला कडील नातेवाईक राजकीय प्रभाव वापरून चुकीचे अहवाल बनवून घेतील व आपल्या मुलीला न्याय मिळणार नाही असा ते बोलत होते.
कुरखेडा वरून वडसा येथे पोलिस हद्द बाहेर जावून शविच्छेदन करणेस असमर्थता दाखवित येथील पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांनी जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्या करिता मुलीच्या वडिलांना तयार करत पोलिस सोबत देवून शव गडचिरोली येथे पाठवून शवविच्छेदन करून घेतले.
खरकडा येथे झालेल्या आत्महत्या प्रकरणात खूप धक्कादायक घडामोडी घडल्या. 15 किलोमिटर कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथे आत्महत्या केलेल्या मुलीचा पी.एम. न करता थेट 75 कम दूर जिल्हा रुंगालयात पी.एम.करण्याचे हट्ट मुलीचे वडील करत होते. शेवटी पोलिस ही त्यांच्या समोर नमते झाले, आणि गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पी एम करण्यात आले. नेमक काय कारण असेल येथे पी एम न करण्याचा? उत्तर स्पष्ट आणि जग जाहीर आहे, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वी राजकीय दबावामुळे दिलेल्या खोट्या वैद्यकीय रिपोर्ट? आपल्या मुलीची ही येथे खोटी व बनावट रिपोर्ट तयार होईल व तिला मृत्यू नंतर आपल्याला न्याय देता येणार नाही कारण येथील उपजिल्हा रुग्णालयात राजकीय हस्तक्षेप एवढं प्रभावी झाला आहे की त्यांच्या मर्जीनुसार खोटी रिपोर्ट ही बनवून दिल्या गेल्याचा जुना इतिहास आहे.
रात्रौ उशिरा गडचिरोली वरून मुलीचे शवविच्छेदन करून शव घेवून पूर्ण कुटुंबीयांनी कुरखेडा पोलिस स्टेशन गाठले. पोलिस स्टेशन समोर शव वाहिनित शव ठेवून मुलाच्या कुटुंब विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. शव घेवून पोहोचलेल्या कुटुंबाला तक्रार दाखल करून घेण्याच्या हमी नंतर कुटुंबातील इतर सदस्य शव घेवून बोळधा कडे निघाले व मुलीचे वडील रात्रौ उशिरा पर्यंत कुरखेडा पोलिस स्टेशन येथे थांबून तक्रार दखल केली.
त्यांनी येथे दाखल केलेल्या तक्रारीत आपल्या मुलीला हंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्या ची तक्रार महेश बाबुराव बनसोड, बाबुराव ऋषी बनसोड, उषाबाई बाबुराव बनसोड, प्रणय बाबुराव बनसोड या संपूर्ण बनसोड कुटुंबीय विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 304 B, 306, 34 अन्वय दाखल केली आहे. रात्रौ 1.30 वाजता तक्रार दखल झालेल्या तक्रारीची प्रत घेवून मुलीचे वडील बोळधा येथे 2.00 वाजता पोहोचले व रात्रीच हर्षदावर येथील दफन भूमीत हिंदू रीतिरिवाज परंपरे प्रमाणे अंत्यविधी करण्यात आला.
कुरखेडा येथे दाखल झालेले अपराध क्रमांक 38/2023 चा पुढील तपास येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत.