December 23, 2024

“घर फोडी करुन चोरी; घरातील सामान अस्तव्यस्त करून लावली आग”

1 min read

कुरखेडा; (प्रतिनिधी); १३ मार्च: मालेवाडा येथील डॉ. मनोहर अत्राम यांचे राहते घरी काल रात्रौ घरफोडी करून चोरी करणाऱ्यांनी समान अस्तव्यस्त करून आग लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेत १ लाख रुपये पर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सविस्तर वृत्त असे की काल अत्राम कुटुंबीय रिसेप्शन मध्ये सहभागी होण्यासाठी कुरखेडा येथे मुक्कामी आला होता. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्यांनी शोधाशोध करून काही दागिने पळविले असून घरातील दोन्ही बेडरूमचे साहित्य अस्त व्यस्त करून अग लावून दिली होती.
सकाळी ८ च्या सुमारास घरातून धूर निघत असल्याची माहिती भ्रमणध्वरीद्वारे अत्राम कुटुंबियांना दिली. निकटवर्ती यांना आगीचे कारण पाहण्यासाठी घरात प्रवेश करण्याची परवानगी देऊन आत जाण्याची विनंती केली. घरात प्रवेश केल्यानंतर तेथील चित्र पाहून येथील नागरिक अवाक झाले व त्यांनी अत्राम कुटुंबीयांना आपल्या घरी घर फोडी होऊन कोणीतरी आग लावण्याची माहिती दिली.
माहिती मिळतात कुठल्या येथे असलेले आत्राम कुटुंबीय मालवाडा येथे पोहोचले व त्यांनी घराची पाहणी करत काही वस्तू चोरीला गेल्याचा शहानिशा केली व येथील पोलीस मदत केंद्र येथे सदर घटनेबाबत तक्रार नोंद केली आहे.
घटनेची माहिती मिळताच येथील ठाणेदार सहकार्यासहित घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
डॉ. मनोहर अकरावी भारतीय जनता पक्षाचे तालुका महामंत्री या पदावर कार्यरत असून त्यांच्या राजनीतिक क्षेत्रात लोकप्रियता वाढत असल्यामुळे काही वैयक्तिक द्वेष असणारी लोक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सदर घटना ही घरपोडी की वैमानस्यातून केलेली कृती आहे हे तपासाचा विषय आहे.

About The Author

error: Content is protected !!