December 23, 2024

“तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा ,अवैध विटाभट्टी विरोधात कुरखेडा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू”

1 min read

कुरखेडा; (प्रतिनिधी); १३ मार्च: तहसील व जिल्हा स्तरावर वारंवार निवेदन सादर करून सुद्धा जिल्हा प्रशासन अवैध उत्खनन विरोधात कुठलीही कार्यवाही करता नसल्याने शेवटी कुंभिटोला वासियांनी येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

व्यवस्थेतील काही भ्रष्ट अधिकारी या अवैध उपसा करणाऱ्यांचे पाठराखण करत असून या अवैध उपस्या मुळे पर्यावरण व लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कुंभिटोला येथील अवैध विटाभट्टी , अवैध रेती उपसा सारख्या गंभीर समस्या व तालुक्यातील अवैध गौण उत्खनन करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही करणे. कुंभीटोला या गावालगत व नदी किनारी सुरू असलेल्या विटा भट्टी गावा पासून व नदी किनाऱ्या पासून ५०० मीटर दूर अंतरावर करण्यासाठी निर्बंध घालणे. मुदत बाह्य जाहीरनामा प्रसिध्द करून गावकऱ्यांना आक्षेप नोंदविण्या पासून रोखण्याचा व अवैध विटा धारकांना भट्ट्या लावून नंतर परवानग्या देण्याचा प्रकार करणा-या प्रशासनिक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणे. सर्व्हे क्रमांक 23 चा बनावट हस्तलिखित ७/१२ तयार करून घेत पडीत जमीन दाखवून शेती मधून रेती काढण्याचा बनाव करून सती नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकारी कर्मचारी ची चौकशी करून निलंबित करणे. आदी मागणी करिता आज सकाळपासून तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर कुंभिटोला येथील चेतन गाहाने, राजू मडावी हे सर्व उपोषणावर बसले आहेत.

About The Author

error: Content is protected !!