“शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीचा भव्य चक्का जाम आंदोलन”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); १५ मार्च: शेतीला उद्योगाचा दर्जा देवून २४ वीज मागणीसाठी १५ मार्च २०२३ ला आम आदमी पक्षाचा भव्य चक्का जाम आंदोलन गुरनोली फाटा,(पॉवर स्टेशन जवळ), गेवर्धा तालुका कुरखेडा येथे यशस्वीरित्या शांतापूर्ण स्थितीत झाला.
आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
महाराष्ट्र शासनाने शेतीला उद्योगाचा दर्जा बहाल करून. उद्योग प्रमाणे शेतीलाही २४ तास अखंडित वीज पुरवठा करावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी कुरखेडा चे वतीने गेवर्धा येथे भव्य चक्काजाम आंदोलन शेकडो शेतकऱ्यांच्या व आप कार्यकर्ते सहभागी होवून कुरखेडा वडसा रस्त्यावर बसून जवळपास २ तास चक्काजाम आंदोलन केले.
शेती पंप करिता दिला जाणारा ८ तासाचा विद्युत पुरवठा वाढवून 16 तास करावे अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरू शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल असा निवेदन सदर करून शासनास इशारा दिला होता. शासन स्तरावरून कुठलेही पाऊल शेतकऱ्यांच्या हितासाठी उचलण्यात न आल्याने रस्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केले.
कूरखेडा तालुक्यात दिला जाणार कृषी विद्युत पुरवठा केवळ आठ तास दिला जात आहे. यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेत पिके करपण्याच्या परिस्थितीवर आहे. सदर ८ तासाचा विद्युत पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागेल. यापूर्वी 12 तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले, परंतु मागील एक महिन्यापासून कृषी जोडणी असलेल्या विद्युत पंपांना केवळ ८ तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याची स्थितीत आले असून या विषयावर तत्काळ निर्णय घेऊन सदर वीज पुरवठा १६ तास न केल्यास शेतकरी पीक हातातून निघून जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उद्योग नसलेल्या जिल्हा व मागासलेली स्थिती असलेल्या या भागात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन आहे. त्यातच वीजपुरवठा केवळ ८ तास झाल्यास शेती कशी पिकवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा थाटला आहे.
सदर अन्यायपूर्ण बाबीचा पुनर्विचार करावा व शेती करिता १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा या मागणी करिता व शेतकऱ्यावर होणाऱ्या या अन्याय विरोधात आम आदमी पार्टीने शेतकरी हितार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन उभारन्याचिवेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
आंदोलन स्थळी महावितरण कुरखेडा येथील उपविभागीय अभियंता मुरकुटे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून चर्चा केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील नायब तहसीलदार अनमदवार यांनी जबाबदारी पार पडली. पोलिस विभागाने आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांनी स्वतः आंदोलन स्थळी तळ ठोकून व्यवस्था बघितली.
सदर आंदोलनात बालकृष्ण सावसागडे जिल्हाध्यक्ष, भास्कर इंगळे जिल्हा सचिव,प्रकाश जीवानी जिल्हा उपाध्यक्ष, कुरखेडा ईश्वर ठाकूर तालुका संयोजक,ताहीर शेख तालुका सचिव,अनिकेत आकरे सह संयोजक,हिरा चौधरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य, दीपक धारगाये सह संयोजक,पंकज डोंगरे सह संयोजक,अतूल सिंद्राम युवा सह सचिव, मुकेश नरोटे कोरची तालुकाध्यक्ष, भरत दहलानी तालुका संयोजक, आशिष गुटके वडसा शहराध्यक्ष, अमोल धाबेकर,गोकुळ यावरकर, तोहसीफ शेख, प्रकाश रक्षे,निलेश बसोना,चंद्रकिशोर बलोरे ,विलास तीर्गम, सचिन मेश्राम, प्रदीप जनबंधू, दिलीप कुमोटी,रवींद्र मडावी,जगदीश रक्से, भास्कर मडावी कुमार नागदेवे, विनोद मेश्राम ,इसाक शेख ,आशु राऊत, तबरेज खान, दीपक नागदेवे ,अतुल ठाकरे ,चंदू ठाकरे, पवन तुमवार, नाजूक लुटे,सौरभ साखरे, शेखर बारापात्रे, शिल्पा बोरकर, सिद्धार्थ गणवीर, वामन पगारे ,परवेज पठाण, प्रमोद दहिवले,आशिष कोवे, धम्मदीप राऊत, योगराज धमगाये,बाबुराव मडावी ,हिरा भाऊ उईके ,विलास चव्हाण, युवराज साडील, परिसरातील शेतकरी सुनील किन्नाके जावेद शेख ,जीवन पर्वते, स्वप्निल नागापुरे ,विकास पर्वते ,योगेश नखाते ,नामदेव नखाते ,बाळकृष्ण नकाते ,वासुदेव बहेटवार, अनिल मचिरके, सुखदेव बुध्द, सोक सुखारे,दीपक सय्याम,भावेश कांबळे ,दामोदर बाराई, रोशन टेभूर्ने,रोशन सय्यद, दिलीप कांबळे आदी मोठ्या संख्येने आप कार्यकर्ते उपस्थित होते.