December 23, 2024

“उपोषण कर्त्यांच्या मागण्या पूर्ण न करता उपोषण मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर; महिला तलाठ्याची उपोषणकर्त्यांना माझेवर कार्यवाही झाल्यास तुमच्या घरी येवून आत्महत्या करण्याची धमकी दिली”

1 min read

कुरखेडा;(प्रतिनिधी); १५ फेब्रुवारी; कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा, तस्करी, विटभट्टी विरोधात कारवाईसाठी उपोषण करणाऱ्यांना महिला तलाठ्याने आत्महत्येची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलिसांत ध्वनिफीतसह तक्रार दाखल केली आहे. मागील वर्षभरापासून जिल्हाभरात मनमर्जी पद्धतीने गौण खनिजाची अवैध तस्करी सुरू आहे.

कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा, तस्करी, विटभट्टी विरोधात कारवाईसाठी उपोषण करणाऱ्यांना महिला तलाठ्याने आत्महत्येची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलिसांत ध्वनिफीतसह तक्रार दाखल केली आहे. मागील वर्षभरापासून जिल्हाभरात मनमर्जी पद्धतीने गौण खनिजाची अवैध तस्करी सुरू आहे.

निलंबित झाल्यास तुला सोडणार नाही, तुझ्या घरी येऊन आत्महत्या करेल.’ अशाप्रकारची धमकी दिली. यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली आहे. दोघांतील संभाषणाची ध्वनिफीतदेखील असून यात ती महिला तलाठी धमकी देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे.

“स्थानिक अधिकारी लोकांकडे तपास दिल्याने न्याय मिळत नाही”

वरिष्ठ स्तरावर सदर गैर प्रकारात चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली जाते. परंतु यंत्रणा त्याच लोकांकडे तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पाठवते. प्रत्यक्षात या सर्व गैर प्रकारात हातमिळवणी केलेल्या लोकांकडून वरिष्ठांना दिशाभूल करणारी व खोटी माहिती सादर करतात. आंधळी नवरगाव , अरत्तोंडी येथील चौकशीत असेच घडले आहे. प्रत्यक्ष सक्ष्य पुरावे असताना सुद्धा अवैध उत्खनन झालेच नाही असा खोटा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला आहे.

“अधिकाऱ्यांना सोडून कर्मचाऱ्यांवर कारवाई”

जिल्ह्यातील रेती तस्करीचा मुद्दा गंभीर आहे. याविषयी प्रत्येक तालुक्यात ओरड आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे तस्कर निर्ढावले आहे. त्यामुळे कारवाईचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लहान कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. यातूनच असे प्रकार घडत असल्याची चर्चा कर्मचारी वर्तुळात आहे.

About The Author

error: Content is protected !!