“दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली पोलीसांनी ४८९६ युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देवून बनविले आत्मनिर्भर”
1 min read
शेळीपालन व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न; शेळीपालनचे 34 व सॉफ्ट टॉईजचे 27 प्रशिक्षणार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण”
गडचिरोली; (प्रतिनिधी); १८ मार्च: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकयांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांचे मागदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना गडचिरोली पोलीस दल व बिओआय , आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने इच्छुक युवक-युवतींना शेळीपालन व सॉफ्ट टॉईजच प्रशिक्षण देण्यात आले होते. सदरचे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्याचा निरोप संमारंभ कार्यक्रम दि. 17/03/2023 रोजी बिओआय आरसेटी कार्यालयात पार पडला.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने शेळीपालन प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली येथील 34 महिला-
पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 05 पुरुष व 29 महिला प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता. दिनांक
08/03/2022 ते 17/03/2023 पर्यंत एकुण 10 दिवसाच्या या प्रशिक्षणात तज्ञांच्या मार्फतीने शेळयांच्या जाती, चारा व्यवस्थापन व लसीकरण संदर्भात प्रशिक्षण व उद्बोधन करुन, शेळीपालन व्यवसाय उभारणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सॉफ्ट टॉईज प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली, धानोरा, कुरखेडा व सिरोंचा येथील 27 महिला-पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 21 पुरुष व 06 महिला प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता.
दिनांक 08/03/2022 ते 17/03/2023 पर्यंत एकुण 10 दिवसाच्या प्रशिक्षणात सॉफ्ट टाईज बनविण्याचे प्रशिक्षण
देण्यात आले. दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन
करतांना अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांनी सांगीतले की, प्रशिक्षणार्थ्यांना स्वत:च्या पायावर व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा दिली व या प्रशिक्षणानंतर तुम्हाला ही संधी प्राप्त झाल्याचे सांगीतले. तसेच उत्कृष्ट हस्तकला तयार करणाया हस्तकलागारांच्या वस्तु ई-प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करुन देणेबाबत गडचिरोली पोलीस दलाने सुरु केलेल्या “प्रोजेक्ट उत्थान” विषयी मार्गदर्शन केले. असे सांगून शेळी पालन व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यत
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गा व अतिदुर्गम भागातील शेतकयांसाठी कृषी विषयक सहलीचे आयोजन व तसेच
बेरोजगार युवक-युवतींना ब्युटीपार्लर 174, कुक्कुटपालन 566, बदक पालन 100, शेळीपालन 149, शिवणकला
241, मधुमक्षिका पालन 53, फोटोग्राफी 65, भाजीपाला लागवड 1395, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 1062, टु
व्हिलर दुरुस्ती 99, मत्स्यपालन 87, फास्ट फुड 96, पापड लोणचे 59, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 502, एमएससीआयटी 200, कराटे प्रशिक्षण 48 असे एकुण 4896 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले
आहे.
सदर निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांचे उपस्थितीत पार पडला. यावेळी कैलास बोलगमवार, संचालक, हेमंत मेश्राम, कार्यक्रम समन्वयक, पुरुषोत्तम कुनघाडकर, कार्यक्रम समन्वयक, गीता मेडपीलवार तज्ञ मार्गदर्शक सर्व बीओआय आरसेटी, गडचिरोलीे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभाग तसेच पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व अधिकारी/अंमलदार,
नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटी ल व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.