“सततच्या भारनियमन व युरिया खत तुटवड्याला कंटाळून कुंभिटोला येथील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); ४ एप्रिल: कुरखेडा तालुका मुख्यालय पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभीटोला येथील शेतकरी देवराम मानकु नैताम (५६). यांनी आज दुपारी १२ वाजेच्यां सुमारास स्वतःच्या शेतातील परसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
प्राप्त माहिती नुसार देवराम नैताम ह्या शेतकऱ्यानी पाच एकरला उन्हाळी धान्य पीक लागवड करुन रोवणी केली होती.धान्य रोवना होवून दीड महिन्याचा कालावधी लोटला असता धान्य पिकाला सततच्या भारनियमनामुळे पुरेसा पाणी होवू शकला नाही. त्यामूळे धान्य शेतात भेगा पडताना दिसल्या व रोवणी केलेल्या धान्याला वेळेवर युरिया खत मिळू न शकल्याने त्यानी अनेक शेतकरी बांधवान कडे आपली व्यथा सांगितली होती.
घरी लग्नाची मुलगी असून एक मुलगा दहावी वर्गात शिक्षण घेत आहे.अशातच आज त्यानें सकाळी दहा वाजता आपल्या मुलाला कुरखेडा ला कामानिमित्त पाठवून आपण घरून दोर नेत शेतावर गेला असता दुपारच्या वेळेस आजूबाजूला कोणीही नसताना पाहून रोडच्या बाजूला असलेल्या शेतात त्या दोरीच्या साहाय्याने स्वतःच्या शेतात असलेल्या पळसाच्या झाडाला दोर लटकवित जीवनाची यात्रा संपवली. या संदर्भात माहिती मिळतात गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेऊन घटनेची माहिती पोलिसांना सांगितले पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला व मृत्यूदेहाचा शविच्छेदनाकरीता कुरखेडा येथे पाठविण्यात आले. घटनेचा तपास कुरखेडा पोलीस स्टेशन करीत आहे.
त्या शेतकऱ्याच्या पश्चात त्यांना पत्नी, एक मुलगा व तिन मुली आहेत. या घटनेमुळे नैताम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.