April 27, 2025

“अन् त्या शेतकऱ्याला मृत्यू नंतर ही भारनियमनाचा त्रास”;

“शीतपेटी शव ठेवले मात्र भारनियमन मुळे लाईन आलीच नाही, शव सुरक्षित न ठेवता आल्याने मुलीला वडीलाची शेवटची भेट ही घेता आली नाही.”

“सततच्या भारनियमन व युरिया खत तुटवड्याला कंटाळून कुंभिटोला येथील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या केली होती”

कुरखेडा; (प्रतिनिधी);एप्रिल: कुरखेडा तालुका मुख्यालय पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभीटोला येथील शेतकरी देवराम मानकु नैताम (५६). यांनी दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्यां सुमारास स्वतःच्या शेतातील परसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती.
उत्तरीय तपासणी नंतर शवविच्छेदन करून सायंकाळी ६ च्या सुपरास शव परिवाराच्या सुपूर्द करण्यात आला होता. तीन मुली पैकी लग्न झालेली मुलगी गुजरात येथे राहत असल्याने मृतक शेतकऱ्याचा शव कुरखेडा येथील नगरपंचायत मध्ये उपलब्ध असलेल्या शित पेटीत ठेवण्याच्या उद्देशाने शीत पेटी मागविण्यात आली. परंतु शेतकऱ्यांचे दुर्दैवच की ज्या भारनियमनाला कंटाळून त्याने आपली जीवन यात्रा संपवली त्या भारनियमनाने त्याची मृत्य नंतर ही पिच्छा सोडला नाही.
शवपेटी आणल्या नंतर शव पेटीत ठेवण्या आधीच कुंभिटोला येथील विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युत पुरवठा रात्रभर परत आलाच नाही. मुलगी गुजरात वरून येण्यास विलंब होईल व तो पर्यंत मृतदेह सुरक्षित राहवा या करिता नातलग व अप्तमित्रांनी कुरखेडा येथील शीतपेटी मिळविण्या करीता केलेली धडपड व्यर्थच ठरली.
अखेर सकाळी शव सुरक्षित नसल्याची कल्पना येताच मुलीची वाट न पाहता परिवार व नातेवाईकांनी अंत्यसंस्कार कार्यक्रम उरकण्यात समजदार दाखविली. मुलीच्या अंतिम दर्शन करिता ठेवलेले शव शीत पेटी उपलब्ध असताना भारनियमन मुळे उपयोगी पडली नाही.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!