निर्दयी निसर्गाने उध्वस्त केले राजगडे कुटुंब; विज पडून एकाच कुटुंबातील ४ मृत
1 min readदेसाईगंज; (प्रतिनिधी); २४ एप्रिल: अवकाळी पावसाने संपूर्ण विदर्भसह गडचिरोली जिल्ह्यात थैमान मजवलेले आहे. आज दुपारी झालेल्या विजेच्या कडकडाटासह पावसात वीज पडून लागलेल्या धक्क्याने एकाच कुटुंबातील ४ सदस्य मृत झाल्याची हृदयविदारक घटना देसाईगंज वडसा येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार भारत राजगडे (35) पत्नी अंकिता (29) वर्ष व दोन मुली देवाशी (4) बाली (2) सोबत दुचाकीने गळगला (मालेवाडा) ह्या गावावरून लग्नावरून परत येत असताना दुध डेरी जवळ तुळशीफाटा च्या जवळ पाऊस व विजाचा कडकडाट सुरु असताना ते आसरा घ्याण्यासाठी झाडाखाली गेले असता त्याच दरम्यान विज कोसळली. वीज कोसळतच संपूर्ण राजगडे कुटुंब क्षणात उध्वस्त झाले. घटनास्थळी सदर हृदयविदारक घटना बहगणाऱ्यांचेही अश्रू अनावर झाले होते.
सादर राजगडे आमगाव बुट्टी येथील असल्याची माहिती आहे.