“महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ फेलोशिप करिता अर्ज आमंत्रित”
1 min read◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:-
1. फेलोला दर महिन्याला ३५,००० रुपये स्टायपेंड दिले जाईल. त्याच बरोबर दर महिन्याला प्रवास आणि संबंधित खर्चासाठी ५,००० रुपये दिले जातील. म्हणजेच दर महिन्याला एकूण ४०,००० रुपये इतकी फेलोशीप रक्कम दिली जाईल.
2. MTDC फेलोशिप प्रोग्राम उमेदवारांना फेलोशिपच्या कालावधीत ईमेल आयडी आणि आय कार्ड दिले जातील.
3. फेलोशीप दरम्यान फेलोंना 10 दिवसांच्या रजा दिली जाईल.
4. 11 महिन्यांची फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोला प्रमाणपत्र दिले जाईल.
◆ फेलोशिप अर्जाची शेवटची तारीख:- १५ मे २०२३
◆ फेलोशिप बद्दल:-
◆ फेलोशिप पात्रता निकष:-
1. उमेदवारांचे वय ३१ मार्च २०२३ रोजी २१ ते २६ वर्षे इतके असावे .
2. उमेदवार कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीसह पदवीधर असावा. तथापि, फेलोशिपच्या माहिती पत्रकात नमूद केल्यानुसार संबंधित क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर पात्रता असलेल्या उमेदवारांना फेलोशिपकरीता प्राधान्य दिले जाईल.
3. उमेदवारांना किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पूर्णवेळ इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप किंवा अप्रेंटिसशिप हे अनुभव म्हणून ग्राह्य धरले जाईल .
4. उमेदवाराचे मराठी भाषेवर प्राथमिक प्रभुत्व, संगणक आणि इंटरनेटवर काम करण्याची क्षमता असावी. इंग्रजी आणि हिंदीचे पुरेसे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे
◆ फेलोशिप अर्ज प्रक्रिया:-
तुमचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, संपूर्ण पोस्टल पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल, पात्रता प्रमाणपत्रांच्या सॉफ्ट कॉपी आणि पासपोर्ट आकाराच्या फोटो फोटोची सॉफ्ट कॉपी gm@maharashtratourism.gov.in वर ईमेल करा आणि dgm@maharashtratourismgov.in हा ईमेल आयडी cc मध्ये ठेवा.
◆ फेलोशिप अटी आणि शर्ती :-
1. या फेलोशिप चा कार्यकाळ ११ महिन्यांचा आहे ज्यामध्ये पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.
2. शैक्षणिक पात्रता अनुभव, वय आणि ओळख संदर्भात कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी केली जाईल. सहभागी होताना फेलोने वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. रुजू झाल्यानंतर फेलोची पोलिस पडताळणी केली जाईल.
3. फेलोला राहण्याची कोणतीही सुविधा दिली जाणार नाही आणि त्याला त्याच्या नियुक्तीच्या शहरात राहावे लागेल.
4. ऑफर लेटर मिळाल्यावर फेलोने सहभागी होण्याच्या दिवशी, ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या ठिकाणी, नमूद केलेल्या वेळी उपस्थित असणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल.
5. फेलोशिप कार्यकाळात फेलो कोणत्याही राजकीय चळवळीचा भाग असणार नाही याची काळजी फेलोंनी घेणे आवश्यक आहे.
◆ फेलोशिप अर्जाची टाइमलाइन:-
ऑनलाइन अर्ज ईमेलद्वारे – २१ एप्रिल ते १५ मे २0२3
प्रवेश परीक्षा – २५ मे २०२३
◆ फेलोशिप निवड प्रक्रिया:-
• टप्पा १ :
भाग १: लेखी परीक्षा
भाग २: सर्वाधिक गुणांच्या आधारे स्टेज २ साठी ५० उमेदवारांची निवड केली जाईल.
• टप्पा २:
भाग 1: निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल ( लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या ५० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल)
भाग २: निवडलेल्या उमेदवारांची यादी एमटीडीसीच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल
◆ लेखी परीक्षेचे स्वरूप
• मल्टिपल चॉईस प्रश्न .
• परीक्षा माध्यम: परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. जिथे शक्य असेल तिथे प्रश्नांचे मराठी भाषांतर आणि पर्यायी उत्तरे दिली जातील.
• परीक्षा एकूण गुण: १००, ५० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल.
• परीक्षा कालावधी: 30 मिनिटे
◆ लेखी परीक्षेची रचना:
1 सामान्य ज्ञान- चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि सामाजिक समस्या यावरील 15 प्रश्न
2 पर्यटन ज्ञान- 15 सामान्य पर्यटन जगभरातील/ राष्ट्रीय/ स्थानिक इ. वर प्रश्न.
3 इंग्रजी भाषा- अर्थ, वाक्य निर्मिती आणि व्याकरण इत्यादींवरील 10 प्रश्न.
4 माहिती तंत्रज्ञान- विंडोज 7, एमएस ऑफिस 2010, इंटरनेट इ. वरील 05 प्रश्न.
5 Quantitative Aptitude – डेटा इंटरप्रिटेशन, अंकगणित, बीजगणित, मूलभूत भूमिती यावरील 05 प्रश्न
लेखी परीक्षेत एकूण 50 प्रश्न असतील प्रत्येकाला 2 गुण आहेत.
◆ फेलोशिप नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक:-
https://drive.google.com/file/d/1ikUe5q3wWBTV3nn0ihs1YrjMLAZ08Ovt/view?usp=sharing
◆ संपर्क तपशील:-
पत्ता-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लि
मफतलाल हाऊस, पहिला मजला, एसटी पारिख रोड, 169 बॅकबे रेक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई 400020, फोन: 022-41580981
ईमेल-
gm@maharashtratourism.gov.in
dgm@maharashtratourismgov.in
वेबसाइट-
https://www.mtdc.co/en/tenders/vacancycareers