December 23, 2024

“नाल्यावरील अतिक्रमण प्रकरण पुन्हा तापणार, विद्यानगर येथील नागरिक आक्रमक”

1 min read

“तहसीलदार कुरखेडा मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आंदोलनाची चेतावणी दिली.”

कुरखेडा;(प्रतिनिधी); २ मे : कुरखेडा येथील मुख्यामार्गवर असलेल्या नाल्यावरील अतिक्रमण करून केलेले पक्के बांधकाम पाडून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्याकरिता मागील ८ महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या विद्यानगर येथील रहिवाश्यांच्या सहनशीलतेचा बांध तुटला असून, येत्या ८ दिवसात या अतिक्रमण बाबत सकारात्मक पुढाकार घेत अतिक्रमण काढले नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून केलेला आहे.
येथील मुख्य मार्गावर असलेल्या प्रमुख नाल्यावरील प्रवाह खंडित करून नाला बुजवून पक्के बांधकाम केल्याने अतिवृष्टी होवून विद्यानगर परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचून पुर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आक्रमक झालेले विद्यानगर येथील रहिवाश्यांनी कुरखेडा -वडसा मार्ग अवरुद्ध करीत 2 तास वाहतूक अडवून ठेवत अतिक्रमण बाबत कार्यवाही करण्याची मागणी केलेली होती.
मागील 8 महिन्यापासून सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे सदर नाल्याची व त्या लागत असलेल्या जमिनीबाबत रीतसर मोजणी होवून भूमी अभिलेख कार्यालय कडून प्राप्त अहवालात सदर बांधकाम हे नाल्यावरील जागेत असल्याचे सिद्ध झाले आहे. सदर जागा अधिकार बाबत असलेले तेढ पण या सिमंकान व मोजणी मध्ये सुटले असून महसूल व वन विभाग यांची मालकी निश्चित झालेली आहे.
सदर अतिक्रमण काढणे करिता महसूल व वन विभाग संयुक्त अभियान राबवित अतिक्रमण काढण्याची नोटीस अतिक्रमण धारकास 8 मार्च 2023 रोजी देण्यात आलेली आहे. परत 10 मार्च 2823 ला अतिक्रमण धारकांने तहसीलदार कुरखेडा यांना बाजू मांडण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला होता, ज्याचे उत्तर दाखल दिनांक 20 मार्च 2023 ला प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी म्हणणे मांडण्याची संधी दिलेली होती. सदर तारखेला सदर अतिक्रमण धारक उपस्थित न राहता जागे बाबत कसलेही पुरावे सादर केले नसल्याचे समजते. आपत्ती संदर्भातील सादर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असताना सुद्धा आज सदर पत्रव्यवहार व अतिक्रमण धारकास संधी देवून दीड महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा सदर अतिक्रमण काढण्यात न आल्याने नागरिक आक्रमक झालेले आहेत. कुरखेडा येथील तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार राजकुमार धनबाते यांच्या दालनात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यानगर येथील रहिवाश्यांनी निवेदन सादर करत आंदोलनाची चेतावणी प्रशासनास दिलेली आहे.
सदर निवेदन सादर करताना ईश्वर ठाकूर तालुका संयोजक,ताहीर शेख तालुका सचिव,अनिकेत आकरे सह संयोजक,, दीपक धारगाये सह संयोजक,अतूल सिंद्राम युवा सह सचिव, मीडिया प्रमुख शहजाद हाशमी,युवा कार्यकर्ता चेतन मैन्द,युवा कार्यकर्ता साईनाथ कोंडावार किशोर चौधरी, रामशिला गुवाल, निखिल जामभूलकर, सिधार्थ आघात, निखिल सोनकुसरे, पंकज राउत, जागेश्वर सोरते, शालिनी राउत, रीना शेन्डे, विशाखा साखरे, गणेश खंडाइत, हीरालाल शेन्डे,रत्नमाला जनबंधु, सुनीता लाबाड़े, माधुरी चौधरी, ऊशाबाई जाड़े, पुष्पाबाई सोरते, संगीता नेवारे, मनोरमा लाडे, अनिता कन्नाके, छत्रतिबाई गनगोइर, मनोज बुंदेले, रजनी राउत, इंदिराबाई जनबंधु, भारती बोदेले, सारुबाई हलामी, दुशिला जाळे, सागर घोडीच्चोर, रामचंद्र जांभूळकर आदी आम् आदमी पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
“अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या दिरंगाई मुळे अतिक्रमणधारकाची न्यायालयात धाव”
प्राप्त माहिती नुसार कुरखेडा येथील मोहन ठरुमाल मनुजा यांनी नाल्यावरील केलेल्या अतिक्रमण हटविणे बाबत तहसीलदार कुरखेडा यांनी ८ मार्च २०२३ रोजी दिलेल्या पत्रानुसार अतिक्रमण काढून टाकण्याची सूचना केली होती. सदर अतिक्रमण बाबत आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती अर्ज दिनांक 8 मार्च 2023 ला केला होता. त्याचे उत्तर दाखल दिनांक 10 मार्च 2023 रोजी तहसीलदार कुरखेडा यांनी पत्र निर्गमित करत 20 मार्च 2023 ला लेखी बाजू मांडण्याची संधी दिली होती. परंतु सदर तारखेला बाजू न मांडता मोहन मनुजा यांनी थेट जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेत प्रकरण दाखल केले असल्याचे समजते. त्यांनी अतिक्रमण काढण्याच्या तहसीलदार कुरखेडा यांच्या दिनांक 8 मार्च व 10 मार्च 2023 चे पत्रावर स्थगिती द्यावी अशी मागणी न्यायालयात दाखल केली असली तरी न्यायालयाने ती अजून मान्य केलेली नाही. जिल्हाधिकारी, उप वनसंरक्षक, मुख्याधिकारी, वन क्षेत्र अधिकारी, भुमि अभिलेख यांच्या नावे दाखल केलेल्या प्रकरणात कुठली ठोस पुरावे नसल्याने निव्वळ वेळ घालवणे करिता व दिशाभूल करणे करिता उठा ठेव करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

About The Author

error: Content is protected !!