“ग्रामपंचायतीने कमवून ठेवलेल्या मालमत्ता नगरपंचायत गमावणार का?”
1 min read“कोट्यावधी किमती असलेल्या स्थावर मालमत्ता बेवारस, दुकान गाड्यांच्या भाडेपत्र व किराया वसुलीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?”
कुरखेडा; (प्रतिनिधी);२५ मे: गडचिरोली जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाचे ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत म्हणून झाले. ग्रामपंचायत काळात निर्माण झालेले मालमत्ता नगरपंचायत कडे वर्ग झाल्या. मात्र वर्ग झालेल्या या स्थावर मालमत्ता सांभाळ करणे कडे नप प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कित्येक मालमत्ता भाडेकरू असलेल्या लोकांनी परस्पर विक्री करून मनमर्जीने बांधकाम करून कब्जा केल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.
नगर पंचायत होताच स्थानिक लोकांची मालकी असलेल्या निवासी मालमत्ते वर अवाढव्य कर लादनाऱ्या नगर पंचायत ला स्वतःची मालमत्तेचा विसर पडावा ही आश्चर्य करणारी बाब आहे. नवीन गाड्यांचा लिलाव करतांना रेडी रेकनर नुसार भाडे निश्चित करून रजिस्ट्रार कडून रजिस्ट्री करणारी नगर पंचायत मात्र जुन्या भाडेकरू कडून ग्रामपंचायत कालीन भाडेच घेणार का? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगरपंचायत स्थापन झाली तेव्हा पासून या स्थावर मालमत्ता असलेल्या दुकान गाड्यांचा भाडे करारनामे सुधा केले गेलेले नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. नगर पंचायत कडे या मत्तेची मालकी दावा सिद्ध करणारी कसलीच लेखा नसल्याचे ही बोलले जात आहे.
नगर पंचायत समोर मुख्य मार्गावर होत असलेल्या या गैर प्रकारावर प्रशासनाचे मौन म्हणजे मुक संमती तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगरपंचायत प्रशासन सुरुवाती पासूनच भगवान भरोसे असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील नगरपंचायती मध्ये पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसणे ही या सर्व अव्यावस्थेची मुख्य कारण आहेत. सध्या महसूल अधिकारी नगरपंचायत चे प्रभारी म्हणून तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांचे कडे प्रभर असेल तरी प्रशासन प्रशस्त व्हावे या करिता यांचे कडून कुठलीही पुढाकार घेतले जात नाहीत. फक्त आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे या एकाच हेतू करिता त्यांना प्रभार दिला असल्याचे एकंदरीत व्यवहारातून स्पष्ट होते.
वेळीच या गंभीर विषयात लक्ष देवून मालमत्ता पत्रक नियमित करून भाडे करार केले नाही तर ग्रामपंचायत काळात कमावलेल्या मालमत्ता गमावून बसण्याची वेळ नगर पांचयीतींना येणार आहे.