मी मनमानी, सुडभावनेने व बेजबाबदारपणे वागतो किंवा काम करतो असे म्हणने पुर्णतःचुकीचे – डॉ. संभाजी ठाकर
1 min readकूरखेडा;(प्रतिनिधी); २५मे: उपजिल्हा रूग्नालय कूरखेडा येथे मागील २५ वर्षापासून कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ संभाजी ठाकर यांचा मनमानी, मूजोरी, बेजबाबदार तसेच सूडभावणापूर्ण वागणूकीने त्रस्त येथील सर्व पक्षीय शहरवासीयानी गूरूवार रोजी येथील उपजिल्हा रूग्नालयात धडक देत वैद्यकीय अधिक्षक डॉ अमीत ठमके यांचाशी चर्चा केली व त्यांचाकडे डॉ. ठाकर यांचा मनमानी कार्यप्रणालीचा पाढा वाचला होता. तसेच त्यांचा मार्फत जिल्हा शल्यचिकीत्सकाना निवेदन पाठवत त्यांचा चौकशी करीत तत्काळ येथून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
डॉ. संभाजी ठाकर बधीरीकरण तज्ञ आहेत त्यांनी आज गडचिरोली न्यूज नेटवर्क ला लेखी स्वरुपात आपले म्हणणे पाठविले असून त्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर केले गेलेले सर्व आरोप फेटाळून लावत आपण प्रामाणिकपणे येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सेवा देत असल्याचे नमूद केलेले आहे. येथील रूग्नालयात सूसज्ज शस्त्रक्रीया गृह आहे येथे नियमित प्रसूती शस्त्रक्रीयासह अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रीया पार पडतात. शस्त्रक्रीया प्रक्रीयेत बधिरीकरण तज्ञांची महत्वाची भूमीका असते त्यानी तपासणी करीत फिटनेस प्रमाणीत केल्याशिवाय शस्त्रक्रीयेची पूढील प्रक्रीया होऊ शकत नाही. याच बाबीचा ते नेहमी गैरफायदा घेत ते अनेक रुग्णांची अडवणूक करतात असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
पदयुत्तर शिक्षणानंतर माझा पुनः पदस्थापना 2018 मध्ये उपजिल्हा रुग्णालय तिरोडा जि.गोंदिया येथे झाली होती. वर्तमान आमदार श्री कृष्णाजी गजबे व अन्य लोकप्रतिनिधींनी स्वतः वयक्तीक ईच्छा प्रगट करित सदर पदस्थापना रदद करू माझी पुनः पदस्थापना उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे करवुन घेतली आहे. ते फक्त माझ्या प्रामाणिक काम करण्याच्या कामसु पणामुळेच.
सदर बातमी मध्ये जे आरोप माझयावर केले, असा प्रयत्न 2020 मध्ये देखील केला होता. या रूग्णालयात सिझारिअन, गर्भ पिशवीच्या, हरणीया , हायेड्रोसेल व अन्य छोटया मोठया शास्त्रक्रिया होतात. शास्त्रक्रियेपुर्वी रूग्णाची तपासणी करून त्यांची शस्त्रक्रियेसाठी फीटनेस
ठरविली जाते. त्यासाठी फीजिसीयन व भुलतज्ञ हे त्याची पिफटनेस ठरवितात. या रुग्णलयातील फीजिसियन व जनरल सर्जन हे सतत सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे कामी असल्याने डयुटीसाठी जातात व या रूग्णालयात त्यांचं मोजकच वास्तव्य असतं. कुरखेडा येथील रुग्णालय हे एफ आर यू रूग्णालय म्हणुन कार्यरत आहे.या रूग्णालयात अत्यवस्थ रूग्णांना तात्काळ उपचार देण्यासाठी अतिदक्षता विभाग नाही त्यामुळे अति जोखमीच्या शास्त्रक्रिया अशा छोटया रूग्णालयात करणे रूग्णाच्या जिवावर बितु नये यासाठी अशा शास्त्रक्रिया करणे टाळणे हेच माता, बाल व नवजात मृत्यू
टाळण्याची पर्यायी व्यवस्था असु शकते. यामागे माझा कुठलेही सुडभावणेचे कारण मुळीच नाही. यापुर्वी
या रूग्णालयात रूग्णांचे शस्त्रक्रियामुळे जिवितहानी झालेली मी पाहिली आहे.
मी कुठल्याही इमर्जन्सी शास्त्रक्रियेच्या रूग्णास सेवा देण्यास नकार दिलेला नाही. ज्या नियोजित शास्त्रक्रियेच्या रुग्णांनात काही जोखीम दिसतात त्या जोखीमेची खबरदारी मी घेण्याचा प्रयत्न करतो , कारण नियोजित शास्त्रक्रियेच्या रूग्णाकडे तो वेळ असतो. मी त्या जोखमेची खबरदारी न घेता सेवा देतांना रूग्णाला काही बाधा झाल्यास सर्व स्तरावर माझोवर निष्काळजीपणाचा आरोप होउ शकतो. त्यामुळे मी मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करून माझा रुगण व मी या दोघांचीही सुरक्षितता जपत असतो.
बाहेरून येणाऱ्या भुलतज्ञांनी देखील अनेक वेळा या रूग्णालयातील काही शास्त्रक्रिया या रुग्णालयाच्या सेवा सुविधांचा विचार करित रदद केल्या आहे, त्या येथे रेकॉर्डवर पहायला मिळतील.
त्यामुळे मी मनमानी, सुडभावनेने व बेजबाबदारपणे वागतो किंवा काम करतो असे म्हणने पुर्णतःचुकीचे असुन त्याला कुठलाही आधार नाही. मी मुख्यालयी राहुन सेवा देतो व डयुटी असो वा नसो वेळोवेळी रफग्णाला सहकार्य करत असतो असे लेखी उत्तर डॉ. संभाजी ठाकर, वैद्यकिय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा यांनी गडचिरोली न्यूज नेटवर्क ला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.