“कुरखेडा नगरपंचायत पदाधिकारी यांनी स्वतःच्या मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी व स्वतः काम करून घेण्यासाठी घनकचरा निविदेत टाकल्या जाचक अटी : खुशाल रामकृष्ण बनसोड यांचा आरोप”
1 min read“निविदा प्रक्रिया थांबविण्याची मागणी तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण चालू असल्याचा आरोप करून प्रकरणाची चौकशी करून दोषी पदाधिकारी वर कार्यवाही करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा”
“ज्या अधिकाऱ्यांनी स्वार्थापोटी अधिकाराचा गैरवापर केला त्यांच्यावर कार्यवाही करावी व सदर निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी व न्याय द्यावा अशी विनवणी ही त्यांनी या पत्रातून केलेली आहे.”
कुरखेडा; (प्रतिनिधी); २७ मे: नगरपंचायत कुरखेडा येथील पदाधिकाऱ्यांनी स्वतः काम करून घेण्यासाठी जाचक अटी टाकून नियमबाह्य निविदा काढल्याचा आरोप येथील कंत्राटदार खुशाल रामकृष्ण बनसोड यांनी केला आहे. नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या नावे केलेल्या तक्रार ची प्रत त्यांनी जिल्हाधिकारी नगर प्रशासन अधिकारी नगर विकास मंत्रालय विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे. सदर प्रकरणात वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा निर्धारही कंत्राटदराने केला असल्याचे सांगितले.
नगरपंचायत कुरखेडा येथे २०२३-२४ वर्षा करिता होऊ घातलेल्या घनकचरा संदर्भातील नवीन निविदेत येथील नगरपंचायत पदाधिकारी यांनी स्वतःच्या मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी व स्वतः काम करून घेण्यासाठी ज्याच्यासाठी टाकल्याचा आरोप करत या अटी रद्द करून निविदा प्रक्रिया थांबविण्याची मागणी खुशाल रामकृष्ण बनसोड यांनी केली आहे.
अंदाजपत्रकीय दरात कुठलीही स्पर्धा न करता काम करून भ्रष्टाचार करण्याचा नगरपंचायत येथील पदाधिकाऱ्यांचा डाव असल्याचा या पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे. भ्रष्टाचार संपण्यासाठी एकीकडे प्रशासन पारदर्शी निविदा प्रक्रिया करण्यासाठी ही निविदा या प्रक्रियेचा उपयोग करते परंतु ई निविदा प्रक्रिया करताना पदाधिकारी या पद्धतीने मनमानी अटी व जाचक शर्ती टाकत असतील तर हा एक नवीन प्रकारचा भ्रष्टाचार म्हणता येईल.
कुरखेडा येथील घनकचऱ्याच्या अटी व शर्तीमध्ये अनुक्रमांक ७ नुसार कंत्राटदाराने स्वतःच्या मालकीचे तीन व्यवसायिक नोंदणी असलेले ट्रॅक्टर ठेवणे बंधनकारक केलेले आहे. अट क्रमांक ६ अनुसार एक कोटीचा घनकचरा संकलन कामाचा अनुभव असावा ही अट आहे. वट क्रमांक 8 नुसार तीन कोटीची आर्थिक उलाढाल असावी असे नमूद केलेले आहे. 75 लाखाच्या निविदेमध्ये एक कोटीची बँक साल्वेनसी ही जाचक टाकण्यात आलेली आहे. क्रमांक 11 नुसार इ एम एस सर्टिफिकेट व जेवी कन्सल्ट्रिम नॉट अलाऊड अशी अट आहे. अट क्रमांक १५ नुसार वेगवेगळ्या तीन नगरपंचायती नगर परिषद नगरपालिका मध्ये घनकचरा व्यवस्थापन व संकलन करण्याचा पाच वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र कार्यारंभ आदेश व काम पूर्णत्वाचा प्रमाणपत्र अशा अवघड व जाचक अटी टाकलेले आहेत.
शासन निर्णयानुसार दीड कोटी पर्यंत कुठल्याही जाचकटी टाकता येत नाही व अट क्रमांक नऊ मध्ये निविदा भरण्याच्या अंतिम तारखेनंतर म्हणजे ०२/०६/२०२३ नंतर कोणतेही दस्ताऐवज कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार नाही. या अटीमध्ये कोणत्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही हे शासकीय नियम बाह्य आहेत. मागील दोन वर्षापासून घनकचरा व्यवस्थापन निविदा ही कमी दराने जात असून स्थानिक कंत्राटदार निवेदे प्रक्रियेमध्ये भाग घेऊन न शकल्याच्या उद्देशाने व सी एस आर मध्ये रिंग करून काम मिळण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण चालू असल्याचा आरोप खुशाल बनसोड यांनी केलेला आहे.
सदर निविदा व नियमबाह्य जाचक अटी शर्ती मुळे ही निविदा पूर्ण रद्द करून मागील तीन वर्षापासून ज्या अटी व शर्ती टाकण्यात याव्यात जेणेकरून स्थानिक लोकांना या निविदेमध्ये सहभाग घेता येईल. ज्या अधिकाऱ्यांनी स्वार्थापोटी अधिकाराचा गैरवापर केला त्यांच्यावर कार्यवाही करावी व सदर निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवावी व न्याय द्यावा अशी विनवणी ही त्यांनी या पत्रातून केलेली आहे. मुख्याधिकारी यांच्या स्तरावर जर न्याय मिळाला नाही तर नाईलाज ते न्यायालयात सदर बाजू मागून मांडून न्याय मागण्याच्या तयारीत असल्याचीही बाब लिहून दिलेली आहे.
“खुशाल बनसोड यांचे आरोप चुकीचे; नगर पंचायत पदाधिकारी यांची नाहक बदनामी केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार – अनिता बोरकर, नगराध्यक्ष नगर पंचायत कुरखेडा.”
नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून मनमर्जीच्या कंत्राटदाराला काम करण्यासाठी जाचक टाकल्याचा आरोप बनसोड यांनी केला आहे हे पूर्ण आरोप येथील नगराध्यक्ष अनिताताई बोरकर यांनी फेटाळून लावले आहेत. नगरपंचायत पदाधिकाऱ्यांच्या विरोधात खोटी तक्रार देऊन बदनामी करण्याचा काम खुशाल बनसोड करत असल्याचा त्यांनी बोलून दाखवल. पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी सदर प्रतिनिधीला दिली. गतवर्षी घनकचऱ्याचा कंत्राट खुशाल बनसोडे यांच्याकडे होता. नियमबाह्य काम केल्यामुळे त्याला नगरपंचायतीच्या वतीने अनेकदा नोटीस पाठवण्यात आलेले आहेत. सदर नोटीशी पाठवूनही त्यांच्या कामात कुठलेही सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी नगरपंचायत हे दर्शवली आहे. याचाच विरोध म्हणून ते नगरपंचायत पदाधिकाऱ्यांवर खोटे आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे नगराध्यक्ष यांनी बोलले आहे.
“तक्रारीची शहनिषा करणे सुरू आहे, योग्य तो निर्णय मुख्याधिकारी म्हणून मी घेणार – राजकुमार धानबाते, प्रभारी मुख्याधिकारी, नगरपंचायत कुरखेडा”
तक्रार प्राप्त झाली आहे त्या संदर्भाने माहिती घेत असल्याची कबुली येथील प्रभारी तहसीलदार व कूरखेडा नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी राजकुमार धनबाते यांनी सदर प्रतिनिधींना दिली आहे. चौकशी अंती तक्रारीत तथ्य आढळल्यास योग्य ते निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.