“कुरखेडा नगर पंचायत येथे शिवसेनेला (ठाकरे गट) घरचा अहेर; स्वपक्षाच्या सत्तेविरोधाच पुकारले बंड”; “ई निविदा गैरप्रकाराची केली लेखी तक्रार”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); २७ मे: कुरखेडा नगरपंचायत येथे स्वतःच्या पक्षाच्या सत्ताधारण विरोधात बंड पुकारत पदाधिकारी पैशासाठी मनमानी व जाचक अटी शर्ती लावून निविदा मध्ये भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला आहे.
एकेकाळी पक्षाचा माणूस म्हणून ज्याच्या चुकीच्या कामांचा समर्थन करणारा नगरपंचायत पदाधिकारी आता गोत्यात सापडलेले आहेत. काम न करताही ज्याला मनमर्जीप्रमाणे निभवून घेणाऱ्या या पदाधिकाऱ्यांच्या अलगट हा कंत्राटदार उठल्याचे सध्यातरी नगरपंचायतला चित्र आहे .
गेल्या अनेक वर्षापासून नगरपंचायत येथे ठेकेदारी करणाऱ्या खुशाल रामकृष्ण बनसोड यांनी शिवसैनिक म्हणून मिरवून अनेक काम आपल्या मनमर्जीने केली व प्रशासनाला आपण सत्तेचे भागीदार आहोत याची ठसन प्रामुख्याने दाखवली. मागील वर्षी घनकचऱ्याचा कंत्राट मिळविण्यासाठी सर्वाधिक कमी बोली बोलून हा कंत्राट मिळवून घेतला. कंत्राट मिळाला खरा पण तो नियम धाब्यावर बसून पूर्ण वर्ष चालवला गेला. अनेकदा लोकांनी तक्रारी करून सुद्धा पदाधिकाऱ्यांनी आपला माणूस समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. कंत्राटाची मुदत संपल्यानंतरही नियमबाह्य पद्धतीने त्याला मुदतवाढ देण्यात आली. नियोजित मजुरांपेक्षा कमी मजूर कामावर ठेवून व गावातील स्वच्छतेची तिलांजली देऊन त्यांनी एकंदरीत घनकचरा व्यवस्थापनाची वाट लावली. या विरोधात बोलणाऱ्या लोकांना नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत पोलीस ठाण्यात डामन्याचाही काम केलं. कामातील संपूर्ण अनियमित असताना सुद्धा त्याची देयके नियमित अदा केली गेली. स्वच्छतेच्या बाबतीत या विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यानंतर मगरूरीच्या भाषेत उत्तर दिले गेले. एकंदरीत पैसे खर्च करून ही गावातील स्वच्छतेची तीन तेरा वाजले. मागील वर्षी असलेला कंत्राट यावर्षी दुप्पटीने किमतीत वाढ झाला. सदर कंत्राट त्यालाच मिळावी म्हणून त्यांनी आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांची हात मिळवणी करून आपल्या मर्जीने अटी व शर्ती ही नियोजित केल्याची चर्चा आहे. परंतु पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या कुठल्यातरी दूसऱ्या कंत्राटदारांसोबत संगणमत करून प्रशासकीय मन्याते मध्ये नसणाऱ्या मनमर्जीच्या अटी यावेळेस कंत्राट निवेदे मध्ये टाकल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट मिळणार नाही याची चाहूल लागताच त्याने आपला रूप बदलत ज्या शिवसैनिक सत्ताधाऱ्यांनी त्याची आजपर्यंत बेबानशाहीला खतपाणी घातलं तोच आता त्याच्या अलगट उलटला आहे. नगरपंचायत पदाधिकारी स्वतः काम करण्यासाठी पैसे उघडतात व ते स्वतः हे काम करतात अशा पद्धतीचा सरसकट आरोप त्यांनी नगरपंचायत च्या सर्व पदाधिकाऱ्यांवर लावलेला आहे.
“भाऊंचा समर्थक” बॅनर वर पहिल्या पंक्तीत फोटो असणारा शिवसैनिक म्हणून मिरवणारा त्याच्या विरोधात अनेक वेळा लांब बंद झालेले हे शिवसैनिक नमते झालेले आहे. त्यामुळे या पद्धतीचा आव्हान व बदनामी केल्या नंतर परत “भाऊंच्या आशीर्वादाने” त्याला मोकळीता मिळते का याचीच चर्चा सध्या गावात आहे. नगराध्यक्ष अनिता बोरकर यांनी पदाधिकाऱ्यांची बदनामी केली व खोटे आरोप लावले या विरोधात फौजदारी दाखल करण्याची भाषा बोलली असली तरी प्रत्यक्षात अजून कुठलीही प्राथमिक कुरखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाली नसल्याची माहिती आहे.