“SSC Result 2023: ऑल द बेस्ट ! आज जाहीर होणार दहावीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा रिजल्ट”

“अखेर आज शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढच्या काहीच तासांमध्ये आपला निकाल पाहता येणार आहे. यंदा राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.”

कुरखेडा; (प्रतिनिधी); २ जून: बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीचा निकाल कधी लागणार या बाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपली असून आज २ जून रोजी १ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (दि.२) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी ११ वाजता पुण्यातील बोर्डाच्या कार्यालयात माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील काही तासात निकाल पाहता येणार आहे.
राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. मात्र,आता निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. खालील अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

http://mahresult.nic.in
https://ssc.mahresults.org.in
http://sscresult.mkcl.org
निकाल जाहीर करण्यासंदर्भात आज बोर्डात सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!