December 22, 2024

कुरखेडा नगर पंचायत येथे सत्ता, विपक्ष एकत्रच; मग निवडणुकीत एक मेकांना विरोध करण्याचा देखावा का करतात?

1 min read

कुरखेडा; (प्रतिनिधी) ; १ जून: कुरखेडा नगरपंचायत येथे सध्या सत्ता आणि विपक्ष हातात हात मिळून एकत्र असल्याचे चित्र आहे. नगरपंचायत कुरखेडा येथे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना , काँग्रेस यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या व भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडणुकीत एकटाच लढला. निवडणुकी दरम्यान एक दुसऱ्यांना पाहण्यात पाहणारे हे पक्ष आता एक दुसऱ्यांच्या गळ्यात हात घालून सत्ता भोगत असल्याचे चित्र आहे.
आपल्याला माहीतच असेल सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाकडे आवश्यक असलेला संख्याबळ होता. परंतु ऐनवेळी एका नगरसेविकेने पक्षासोबत बंडखोरी करत शिवसेना काँग्रेस यांच्या युतीला सहकार्य करत सत्ता स्थापनेची मदत केली होती. पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत विप पालन न केल्याने त्यांच्या विरोधात येथील भारतीय जनता पक्षाचे गटनेता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेची तक्रार दाखल केली होती या तक्रारीचा निर्णय लागून जिल्हाधिकाऱ्यांनी युक्त नगरसेविकेला अपात्र घोषित केले होते. या अपात्र घोषित केलेल्या निर्णयाच्या विरोधात शिवसेना काँग्रेस युतीने थेट नागपूर येथील उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रकरणात राहिलेल्या उणिवा दूर करून उचित निर्णय घेण्याच्या सूचना करत प्रकरण परत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे वर्ग केलेले आहे. सध्या हा प्रकरण विशेष असून जिल्हाधिकाऱ्याने अजून याबद्दल कुठलाच निर्णय दिलेला नाही.
सत्तासुखासाठी एक दुसऱ्यांना पाण्यात पाहणारे शिवसेना, काँग्रेस व भारतीय जनता पार्टी कोणत्या स्वार्थासाठी एका कंत्राटदाराच्या विरोधात उभे झाले आहे हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे. कारण सदर कंत्राटदाराने केलेले आरोप मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केले होते. त्या बाबत कुठलीही चौकशी किंवा प्रत्युत्तर कंत्राटदाराला अजून तरी देण्यात आलेले नाही. केलेल्या आरोपाची शहानिशा करून ते आरोप तथ्यहीन आढळले असते , व त्यानंतर बिनबुडाचे आरोप केल्याचा ठपका ठेवत सदर कंत्राट दारावर प्रशासन स्तरावरून कार्यवाही झाली असती तर ती कार्यवाही न्याय सांगत आहे असं म्हणता आलं असतं. ज्या विषयाला धरून होते त्याची चौकशी न होता सरसकट मानहानी केल्याचा गुन्हा तक्रार दाखल करणे हे कुठेतरी दडपशाहीचे निर्माण करण्याचे चित्र असल्याचे दिसत आहे. येथे अजून एक गंमत आहे ती अशी की जरी काँग्रेस शिवसेनेची सत्ता नगरपंचायत येथे असली तरी आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांच्याकडे सभापती पद आहे. सत्ता एका पक्षाची आणि सभापती पद दुसऱ्या पक्षाकडे हे कसं काय शक्य होतं एवढं राजकारण खरंच लोकांना अजून समजलेले नाही. म्हणजे “काँग्रेस शिवसेनेच्या सत्तेत भारतीय जनता पक्षाचा आमदार मंत्री झाल्यासारखाच विषय इथे आहे”.
हाच कारण असेल की, कचऱ्याच्या संदर्भात झालेला वाद हा सर्वपक्षीयवाद म्हणून स्वीकारला गेला असेल आणि या मुळेच कंत्राटदार विरोधात सर्व एक सुरात बोलत आहेत.
सत्ताधाऱ्यांनी नीट सत्ता चालवावी व एकूण का व्यवहारात पारदर्शकता असावी याकरिता विपक्ष प्रामाणिक भूमिका पार पाडत असतो परंतु कूरखेडा नगरपंचायत येथे सत्ताधारी व विपक्ष हातात हात मिळवून एक दुसऱ्यांना वाजवी गैरवाजवी सहकार्य करत असल्याचे चित्र आहे.
पक्ष विरोधात काम करून शिवसेनेच्या हातात सत्ता देणाऱ्या नगरसेविकेचा यांनी प्रखर विरोध केला होता. नको त्या अर्वाच्च भाषेत बोलले होते. भारतीय जनता पक्षातील निष्ठावान म्हणून घेणारे हमरी तुमरी वर उतरले होते. आता तीच मंडळी कोणत्या लोभासाठी सत्ताधाऱ्यांसोबत “हम साथ साथ है”, सारखे चित्र निर्माण करत आहेत हे न उलगडणारे कोडे आहे. सध्या नगर पंचायत येथे सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी कडे बघून शहरातील लोकांच्या मनात एकूणच संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींमध्ये तो प्रामाणिक कार्यकर्ता जो पक्षनिष्ठ आहे तो कुठेतरी गुदमरल्यासारखा झालाय. पक्षाच्या प्रामाणिकतेसाठी त्यांनी स्वयंकासोबत घेतलेला दुरावा कुठेतरी त्याने अशा स्वार्थी राज्यकर्त्यांसाठी चूक केली अशी खंत त्याच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामुळे प्रामाणिक, पक्षनिष्ठ कार्यकर्ता स्वतःच्या अस्तित्वासाठी झटत आहे किंवा त्याला या गोष्टी पटत नाहीयेत तरी तो व्यथा मांडावी तरी कोणाकडे या विवेचनेत वावरत आहे.

About The Author

error: Content is protected !!