“अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या: अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी”
1 min readएटापल्ली; अनवर शेख; (प्रतिनिधि); १४जून: तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी मुलीवर बळजबरी अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा मुलचेराच्या वतीने तहसीलदार सर्वेश मेश्राम यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गडचिरोली ,आदिवासी विकास मंत्री, जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
10 जून रोजी सदर अल्पवयीन मुलगी टीसी घेण्यासाठी आलापल्ली येथे गेली होती, सदर विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी जबरीने दारूपाजून अत्याचार केला .अशा आरोपींवर कोणत्याही प्रकारची दया न दाखवता कठोर शिक्षा करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सतीश पोरतेट युवा तालुका अध्यक्ष, संदीप तोरे युवा तालुका उपाध्यक्ष ,विकास नैताम नगरध्यक्ष ,केजिकराव आरके युवा तालुका मीडिया प्रतिनिधी,रमेश कूसनाके जेष्ठ सल्लागार, ऑल इंडिया आदिवासी फेडरेशनचे विभागीय उपाध्यक्ष वासुदेव मडावी, आहे राकेश मरापे,उदव आलाम, प्रकाश आलाम,बाजीराव मडावी,गजानन आत्राम,हणमतु मडावी,करण मडावी,संतोष तोरे,सुरेश आलाम सुरज सिडाम ,निकिल आत्राम आदि उपस्थित होते.
“परिसरातील सम्पूर्ण आदिवासी समाज बांधवांन मार्फत रस्तारोखो आंदोलन”
आलापल्ली येथे घळलेला अल्पवयीन आदिवासी मुलीवर सामूहिक रित्या बलात्कार केलेल्या त्या दोन नरादम हरामखोरांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्या अल्पवयीन आदिवासी मुलीला न्याय मिळवून देण्या करीता उद्या दि.14/6/2023 रोज बुधवारला पेरमिली येथे आलापल्ली ते भामरागड मुख्य मार्गांवर पेरमिली परिसरातील सम्पूर्ण आदिवासी समाज बांधवांन मार्फत रस्तारोखो आंदोलन व पेरमिली गावातील बाजारपेठ कळकळीत बंद ठेवणार आहोत या करीता मा. प्रभारी अधिकारी श्री. धवल देशमुख साहेबांना निवेदन देण्यात आले. तरी पेरमिली परिसरातील समस्त जनतेनी व सर्व लोक प्रतिनिधीनी उद्याला सकाळी 7.00 वाजता पेरमिली येथील मुख्य चौकत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.