फरार ट्रॅक्टर मालकाला तहसिलदारांची नोटीस; नोटीस मिळताच तात्काळ ट्रॅक्टर जमा करण्याचे निर्देश; फौजदारीची टांगती तलवार?
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); १४ जून : कुरखेडा तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी केलेल्या कारवाईदरम्यान तीन पैकी एक ट्रॅक्टर जप्त केल्यानंतर पळून गेला होता. सदर फरार झालेल्या ट्रॅक्टरची घटनास्थळी चित्रीकरण करून घेतली होती त्यामुळे सदर ट्रॅक्टरच्या नोंदणी क्रमांक वरून मालदूगी येथील महेंद्र सहारे यांना सदर ट्रॅक्टर तात्काळ जमा करण्याची नोटीस तहसीलदार कुरखेडा यांनी बजावली आहे. नोटीस प्राप्त होताच तत्काळ ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
कुरखेडा तालुक्यामध्ये होत असलेल्या अवैध वाळू उपसा विरोधात प्रशासनाने गांभीर्य दाखवत रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्यासाठी पथक तयार करून धाड टाकत कार्यवाही केले. तहसीलदार यांच्या सदर कारवाई मुळे जनसामान्यात समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शनिवारी रात्री केलेल्या सदर कारवाईदरम्यान कुंभिटोला सती नदी पात्रात दोन ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू उपसा करत आढळले होते. कार्यवाही दरम्यान जप्त केले ट्रॅक्टर एम एच ३३ वी ३२३७ कुरखेडा तहसील कार्यालय येथे जमा करने करिता नेत असताना वाटेतून बोपारा करत पसार झाला होता. जप्ती कार्यवाही दरम्यान सदर ट्रॅक्टर चे गिओ टॅग फोटो घेतले असल्याने ट्रॅक्टर नोंदणी क्रमांक वरून सदर ट्रॅक्टर मालक मालदुगी येथील महेंद्र सहारे असल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेच्या रात्रीच सदर ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी भरारी पथक मालदुगी येथे गेला होता. परंतु पसार झालेला ट्रॅक्टर मिळून आला नाही. दुसऱ्या दिवशी सदर ट्रॅक्टर जमा करण्याचे सूचना संबंधिताला करण्यात आल्या होत्या. परंतु दोन वेळा अवैध वाळू उपसा प्रकरणात अडकलेले सदर ट्रॅक्टर तिसऱ्यांदा कारवाई झाल्यास तो परत सुटणार नाही याची कल्पना असल्याने त्याने ट्रॅक्टरसह फरार होण्याची युक्ती लढवली. परंतु घटनास्थळी झालेल्या मोका पंचनामा व छायाचित्र यामुळे सदर ट्रॅक्टर चालक व मालक कमालीची अडचणीत आले आहे. ट्रॅक्टर जप्ती नंतर होणारी दंडात्मक कारवाई होईलच. सोबतच शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून फौजदारीही दाखल होण्याची परिस्थिती सदर प्रकरणात निर्माण झालेली आहे. सदर ट्रॅक्टर तहसीलदार यांच्या सुपूर्द न झाल्यास या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन कुरखेडा येथे लवकरच फौजदारी दाखल होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.