“अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या वतीने निवेदन सादर करून पीडित आदिवासी मुलीस न्याय देण्याची मागणी”
1 min readअहेरी: अन्वर शेख (प्रतिनिधी); १४ जून:- आलापल्ली येथे झालेल्या घटने विरोधात अनेक संघटना समोर आले असून अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी जोर धरत आहे.
आज येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महिला आघाडीच्या वतीने निवेदन सादर करून बलात्कारी हरामखोरांना कठोर शिक्षा व्हावी व पिडीत मुलीला योग्य न्याय मिळावा याकरिता अहेरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्याशी चर्चा करून निवेदन सदर केले आहे.
अल्लापल्ली येथे 10 जून रोजी दहावी उत्तीर्ण मुलगी बाहेर गावावरून शालेय कामानिमित्त आलापल्ली येथे आले असता, नराधम निहाल कुंभारे व रोशन गोडशेलवार या युवकांनी त्या अल्पवयीन आदिवासी मुलीला दारू पाजून अतिप्रसंग केला.
आलापल्ली येथे घडलेली ही घटना घाणेरडी,घृणास्पद व चीड आणणारी असून सदर प्रकरण अत्यंत गंभीर व निंदनीय असा आहे. तात्काळ या प्रकरणाचा निर्वाळा लावून आरोपी निहाल कुंभारे आणि रोशन गोडशेलवार यांना कठोर अशी फाशीची शिक्षा द्या.एवढेच नव्हेतर,या घटनेत आणखी कोणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्यास सखोल चौकशी करून त्यांच्यावरही योग्य कारवाई करा अशी मागणी महिलांनी केली आहे.
निवेदन देताना यावेळी अभाविप महिला आघाडी अध्यक्षा सौ. वर्षा शेडमाके, माजी आरोग्य सभापती, परिषदेच्या सल्लागार सौ. रंजिताताई कोडापे,माजी सभापती समाज कल्याण, सुनीताताई मडावी, जुमनाके आदी उपस्थित होते.