“गॅस दर वाढ विरोधात महिला काँग्रेस चे अनोखे आंदोलन”
1 min readदेसाईगंज; (प्रतिनिधी); १४ जून: २०१४ पर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेसने तत्कालीन स्थितीत ४०० रुपये प्रती गॅस सिलिंडर मिळत असताना त्यांच्या ५४ वर्षांच्या कारकिर्दीत काहिच केले नसल्याचा ढोल पिटत सत्ता परिवर्तन घडवून आणले. वर्तमान स्थितीत गॅसचे दर १२०० रुपया पर्यंत पोहचल्याने गॅसचे दर गोरगरीबांच्या आवाक्याबाहेरचे झाल्याचे पाहु जाता राजस्थानच्या काँग्रेस सरकारने ५०० रुपयात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणे सुरू केले.त्याच धर्तीवर मुख्यमंत्रींजी महाराष्ट्रात ही, “गॅसचे दर तत्काळ कमी करा”, “नाहितर खुर्ची खाली करा”, च्या घोषणा देत देसाईगंज तालुका महिला काँग्रेस कमिटीने येथील फव्वारा चौकात अनोखे आंदोलन केले.
सदर आंदोलन गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे व माजी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांच्या माग॔दश॔नात देसाईगंज तालुका महिला काँग्रेसच्या पुष्पा कोहपरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी बेबी पठाण,सफीका शेख,विमल मेश्राम,कांताबाई भोयर, कमला डोनारकर,पूजा कोल्हे, कमला मेश्राम,संगीता गणवीर,शालू मेश्राम,पुष्पा मेश्राम,ताराबाई कांबळे, शालिनी मेश्राम,सुनंदा बगमारे,वच्छला मेश्राम, कलाबाई भुते,प्रियंका वानखेडे दिव्या बोदेले,इंद्राबाई भैसारे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,नरेश लिंगायत,जितू गेडाम,शुभम तोडकर आदी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
सद्या स्थितीत केंद्रात आणि राज्यातही भाजपाची सत्ता आहे.केन्द्र शासनाने धुरमुक्त गाव,चुलमुक्त गावाचा नारा देत प्रधानमंञी उज्जवला गॅस योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडरचे वाटप केले.माञ वर्तमान स्थितीत गॅसचे दर गोरगरीबांच्या आवाक्याबाहेरचे झाल्याने मोफत वाटण्यात आलेले गॅस सिलिंडर धुळ खात पडुन आहेत.सरपणाची गरज म्हणून संबंधितांना जंगलांकडे धाव घ्यावी लागत आहे.परिणामी जंगलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहेत.
दरम्यान वन्यप्राणी व मानवी संघर्षात अनेकांचा बळी जाऊन कित्येक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. चुलीचा वापर अधिक होऊ लागल्याने प्रदुषण वाढु लागले आहे.यातुन सावरण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसनी आपापल्या राज्यात गोरगरीबांना ५०० रुपयात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणे सुरु केले आहे.राजस्थान राज्यात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली असुन उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना व बीपीएल कार्डधारकांना याचा प्रत्यक्ष लाभ दिल्या जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील महिलांची एकच मांग,आमचा अधिकार आमचा हक्क, मुख्यमंत्रीजी सिलिंडर गॅसच्या किंमती तत्काळ कमी करा नाहितर खुर्ची खाली करा च्या घोषणा देत अनोखे आंदोलन केले.