“खासदार अशोक नेते ची उपोषण स्थळाला भेट”; रेती प्रकरणात दोषींवर तात्काळ कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन”
1 min readअहेरी; अनवर शेख, (तालुका प्रतिनिधी); १५जून: खासदार अशोक नेते यांनी आज अहेरी येथील उपोषण स्थळाला भेट देत उपोषणकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांची अस्थेने विचारपूस करून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सोबत प्रकरण संबंधी चर्चा करून तात्काळ विना विलंब प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटातून एकाही रेतीची उचल न करता टिपी (वाहतूक परवाना) येचली येथील दाखवून भामरागड अहेरी तालुक्यातील बांधकामात रेतीचा वापर केल्याने सदर प्रकरणांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करुन संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदार दोषींवर तत्काळ फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याच्या मागणी करिता येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर संतोष रामचंद्र ताटीकोडावार यांनी १४ जून पासून येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर “आमरण” उपोषण सुरू केले आहे.