“खोब्रामेंढा येथून खोब्रागडी/सती नदी संवाद यात्रेचा शुभारंभ”
1 min readगडचिरोली,(प्रतिनिधी) 16 जून : चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत खोब्रागडी नदीच्या उगमस्थानी भेट देऊन नदी संवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली. त्या यात्रेचा भाग म्हणून खोब्रामेंढा येथील हनुमान देवस्थान येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजकुमार धनबाते कुरखेडा, प्रमुख अतिथी म्हणून धीरज पाटील, संवर्ग विकास अधिकारी, कुरखेडा, श्री. शेंडे पाटबंधारे विभाग ब्रम्हपुरी, महेश कारंगुलवार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, वडसा, जास्वंदा धुर्वे, सरपंचग्रा. पं. खोब्रामेंढा, तर नदीप्रहरी डॉ. सतीश गोगुलवार, नदीप्रहरी, केशव गुरनुले, माधवदासजी निरंकारी , रवींद्र गोटेफोडे, समाजसेवक विलासराव गावंडे, राजेशजी उईके, विविध विभागातील शासकीय कर्मचारी व खोब्रामेंढा येथील ग्रामस्थ उपस्थितहोते.याप्रसंगी तहसीलदार धनबाते, डॉ. सतीशजी गोगुलवार, रवींद्रजी गोटेफोडे, विलासराव गावंडे यांनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशवजी गुरनुले यांनी केले.नदी जोड संवाद यात्रेत नदीप्रहरी डॉ.सतीश गोगुलवार व नदीप्रहरी श्री केशव गुरनुले यांना कलश सोपविण्यात आले. सदर यात्रा बदबदा, कसरबोडी, मालेवाडा व्हाया रानवाही मार्गे सती नदी तिरावरडोंगरगाव, येरकडी, मरारटोला, अंतरगाव येथील लोकांसोबत जाहीर सभा झाली वनंतर नदी पात्रातून पदयात्रा करून खेडेगाव येथे पोहचले. त्यानंतर खेडेगाव येथील लोकांसोबत सभा व संवाद झाली. नंतर त्याच ठिकाणी मुक्काम करण्यात आले.