“आरोपी – फिर्यादी एकाच बॅनर वर ; नगरपंचायत पदाधिकारी यांची बदनामी केल्या प्रकरणी फौजदारी दाखल केल्याचे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात?”
1 min readकुरखेडा; (प्रतिनिधी); १६ जून: एरवी वाढदिवस शुभेच्छा व राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याकरिता फ्लेक्स बॅनरचा उपयोग केला जातो. सध्या कुरखेडा येथील एका बॅनरची चर्चा खूप जोरात सुरू आहे. सदर बॅनर चे वैशिष्ट्य म्हणजे या बॅनरवर नगरपंचायत पदाधिकाऱ्यांवर आरोप करून बदनामी करणाऱ्या कंत्राटदाराचे फोटो पदाधिकाऱ्यांसह लागलेले आहे फिर्यादी व आरोपी दोघांचेही फोटो लावलेले असल्याने कमालीचा आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
नगरपंचायत कुरखेडा येथे घनकचरा व्यवस्थापनाचे निविदे वरून मोठा वाद निर्माण झाला होता. सत्ता पक्षाच्या एका समर्थकाने कंत्राट स्वतःला मिळावा यासाठी येथील कर्मचाऱ्यांसोबत हात मिळवणी करून मर्जीतील अटी व शर्ती सामील करून ही निविदा मागवण्याची तयारी केली होती. सदर प्रकरण सत्ता पक्षातील पदाधिकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर निविदेतील अटी शर्ती बदलून किचकट अशा अटी शर्ती टाकल्या होत्या. सदर कंत्राट आपल्याला न देता दुसऱ्या कोणासोबत तरी आर्थिक देवाण-घेवाण करून पदाधिकारी कंत्राट देत असल्याचा संशय मनात घेत खुशाल रामकृष्ण बनसोडे यांनी कुरखेडा नगरपंचायत च्या पदाधिकाऱ्यांविरोधात कुरखेडा येथील नगरपंचायत चे मुख्याधिकारी राजकुमार धनबाते यांना निवेदन सादर करीत भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. स्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या आरोपाने व्यथीत होऊन सत्ता पक्षातील लोकांनी सदर कंत्राटदार विरोधात लाम बंद होत कुरखेडा पोलीस स्टेशन येथे कंत्राटदार खोटे आरोप लावत बदनामी करत असल्याचा लेखी निवेदन सादर करून गुन्हा नोंद करण्याची विनंती ठाणेदार यांना केली होती. प्रकरणाची शहानिशा करून अदखल पात्र गुन्हा दाखल करत समाज पत्र दिले होते. फौजदारी दाखल न झाल्याने परत त्यावर पाठपुरावा चालू असल्याचा पदाधिकाऱ्यांनी बोलना करून दाखवला आहे.
एवढी सगळी उठा ठेव करत असताना नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिवस व आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त पक्षाच्यावतीने जो बॅनर लावण्यात आला त्यामध्ये कुरखेडा नगरपंचायत येथील पदाधिकारी व शिवसैनिकांचा समावेश आहे. परंतु सदर बॅनर मध्ये प्रकरणातील फिर्यादी नगराध्यक्ष अनिता बोरकर व आरोपी असलेले व पक्षाच्या सत्तेविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप लावणारे खुशाल रामकृष्ण बनसोड यांचाही फोटो आहे. सदर बॅनर कडे पाहून लोकांचे मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की फौजदारी दाखल करण्यापर्यंत मनस्ताप झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदाराचा फोटो आपल्या सोबत बॅनर वर का लावला? एवढा मोठ्या प्रमाणात बदनामी केल्याचा ठपका ठेवत फौजदारी दाखल न झाल्याने पाठपुरावा करून ते दाखल करून घेण्याची तयारी व नगरपंचायत कुरखेडा मधून सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्याची तयारी असताना सुद्धा या पद्धतीने बॅनर वर स्थान मिळणे म्हणजे लोकांना आश्चर्याचा धक्का बसणे स्वाभाविक आहे.
” कुरखेडा नगर पंचायत चे नगराध्यक्षा अनिता बोरकर यांनी सदर बॅनर संदर्भात आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सदर प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे. कुणी सदर बॅनर छापले आणि सदर कंत्राटदाराचा फोटो कुणी टाकला हे माहीत नसल्याचे बोलले आहे”
प्राप्त माहितीनुसार सदर जाणार हा वडसा येथील एका प्रिंटिंग प्रेस मधून छापण्यात आला शिवसेनेचे कामगार नेते अनिल उईके यांच्याकडे सदर बॅनर छापण्याची जबाबदारी होती. त्यांनी बॅनर छापण्यात करिता सदर प्रिंटिंग प्रेस वाल्याला कळवले होते. पदाधिकारी व इतर लोकांचे फोटो पूर्वीपासूनच तिथे उपलब्ध असल्याने त्या दुकानदाराने मजकूर बदलून फोटो तसेच ठेवले असल्याचे सांगितले. जुना बॅनर वर पहिल्या दिर्घेत असणारे सदर कंत्राटदार आता दुसऱ्या रांगेत या बॅनरवर पाहायला मिळत आहेत. फिर्याद आणि गुन्हा नोंद झाला असला व काळे यादीत समाविष्ट करण्याची तयारी असली तरीही कार्यकर्ता म्हणून अजूनही खुशाल रामकृष्ण बनसोड हे पक्षाच्या जवळचे असल्याचे चित्र सध्या या बॅनर मुळे दिसत आहे.
“निविदा सादर करताना स्थायी आदेश ३६ प्रमाणे दाखल शपथपत्र खोटे तर ठरत नाही ना?”
नगरपंचायत कुरखेडा येथे निविदा सादर करताना त्यासोबत स्थायी आदेश ३६ प्रमाणे एक शपथ पत्र लिहून द्यावा लागतो त्या शपथ पत्र मध्ये स्थानीय पदाधिकारी व नगरसेवकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नसल्याचा लेखाजोखा असतो. परंतु आता प्रत्यक्षातच पदाधिकारी यांच्यासोबत कंत्राटदाराचे फोटो छापले जात असतील तर स्थायी आदेश ३६ प्रमाणे सादर केलेले कंत्राटदाराचे शपथपत्र खोटे तर नाही ना? अशी शंका उत्पन्न केली जात आहे.