December 23, 2024

“चाकू हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल; आरोपी अजून मोकाटच”

1 min read

कुरखेडा, (प्रतिनिधी); १८ जून: कुरखेडा येथील अजाझाद वॉर्ड येथे शुक्रवारी रात्री झालेल्या चाकू हल्ल्यात जखमी झेलेल्या युवकाने येथील पोलिस स्टेशनला तक्रार नोंद केली होती. सदर युवकाची वैद्यकीय तपासणी करून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अभिप्राय नंतर गुन्हा दाखल झाला होता.
प्राप्त माहिती नुसार आझाद वॉर्ड येथील युवक सूरज विजय जांभूळकर (३२) हा आपल्या वाढदिवसाचे औचित्य म्हणून मित्रांना घरी जेवण करण्यासाठी निमंत्रित केले होते. जेवण पूर्वी सर्व मित्र घरासमोरील नगर पंचायतचे बाकांवर बसले होते. एवढ्यात ९.३० दरम्यान शेजारी राहणारा अजू सय्यद ( ५५ ) हा हातात चाकू घेवून तेथे आला व येथे बसलेल्या युवकांवर चाकू फिरवू लागला. तू हे काय करतोय असा विचारणा केली व अडवायला गेला तेवढ्यात अजु सय्यद याने सूरज जांभूळकर याच्या पोटात चाकूने वार केला. पोटात चाकू लागल्याने एक इंच एवढी आडवी चिर लागल्याने रक्त स्त्राव सुरू झाला. सुदैवाने चाकू पोटात जास्त आत लागला नाही. एवढ्यात उपस्थित इतर मित्रांनी मध्यस्ती करत अजु सय्यद याला अवरले. तो पडून घरी गेला. घटने नंतर सूरज व त्याच्या मित्रांनी कुरखेडा पोलिस स्टेशन कडे धाव घेतली. येथून उपजिल्हा रुग्णालय येथे सूरजला उपचारा करिता दाखल केले.

सूरज जांभूळ
सूरज जांभूळकर याच्या पोटाला झालेली जख्म.

कुरखेडा उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी सूरजची तपासणी करून त्याच्या जखमेला उपचार केले. उपचार नंतर वैद्यकीय अभिप्राय घेवून परत पोलिस स्टेशन गाठले व फिर्याद दखल केली. १७ जून २०२३ रोजी ००:२१ वाजता विविध कलम खाली अजु सय्यद यांचेवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होवून २४ तास लोटले असेल तरी अजून पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. गुन्हा दाखल होवून अजून अटक न झाल्याने आरोपीची हिम्मत अधिक वाढली असल्याचे सूरज यांचे म्हणणे आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी व अनुसूचित जाती व जनजाती अत्याचार अधिनियम कलमाखाली गुन्हा नोंद करून तपास करावा अशी मागणी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!