April 25, 2025

“नवेगांव (जांभळी) येथे उत्साहात नदी संवाद यात्रा, नदी ढोह जल पूजन साजरा”

गडचिरोली, (प्रतिनिधी); १८ जून : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू केलेला लोकहिताचा चला जाणुया नदीला या नदी संवाद यात्रेची अंमलबजावणी गडचिरोलीत सुरू आहे. यात्रेचे आगमन झाल्यानंतर नवेगांव (जांभळी) येथील नागरिकांनी उत्साहात नदी संवाद यात्रा, नदी ढोह जल पूजन तसेच जल पर्यावरण संरक्षण करण्याचा सामुहिक प्रतिज्ञा करूण साजरा केलेले आहे.

चला जाणुया नदीला नदी संवाद यात्रा अंतर्गत पोहार पोटफोड़ी नदी समन्वयक व नदी प्रहरी प्रकाश आर अर्जुनवार यांच्या नेतृत्वात 16 जून रोजी नवेगांव या गावी पोहचले.
रात्रीचा वेळी संवाद यात्रा चा नवेगांव येथिल चौकात आज़ादी च्या अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू केलेला लोकहिताचा चला जाणुया नदीला या नदी संवाद यात्रा संबंधी सखोल माहिती ची जाणीव जागृति करण्यात आले.
या वेळी जांभळी ग्राम पंचायत चे सरपंच प्रदीप उसेंडी यांच्या अध्यक्षते खाली तसेच उपसरपंच श्री पुरूषोत्तम बावणे, सामाजिक कार्यकर्ता एम डी चलाख व अशोक पदा तसेच प्रमुख नागरिकांचा उपस्थितीत कार्यक्रम उत्साहाने साजरा केले.
त्याच प्रमाने ठरविलेले कार्यक्रमा प्रमाणे नवेगांव येथिल जागरूक प्रमुख नागरिकांचा आणि महिलांचा नेतृत्वात पोहार पोटफोड़ी नदी च्या पात्रात जाऊण चला जाणुया नदीला चा महत्व समझून व पटवून सांगण्यात आले.
यावेळी पोहार पोटफोड़ी नदीतिल तिरेपन देव स्थान चा ढोह ठिकाण पर्यंत नदी संवाद यात्रा काढून जाऊन नदीत जल पुनर्भरण चा कार्य केले त्याच प्रमाणे गावातील लोकांनी नदी पात्रात रेला नृत्य करूण नदी जल व पर्यावरण संरक्षण करण्याचा सामुहिक प्रतिज्ञा केले हे महत्वाचे वाटले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!