December 23, 2024

“बौद्ध समाजातील तरुणावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; समाज बांधवांकडून निवेदनद्वारे मागणी”

1 min read

कुरखेडा,(प्रतिनिधी); १९जून: कुरखेडा येथील बौद्ध समाजातील युवकावर चाकू ने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणी करिता येथील बौद्ध समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

दिनांक 16 जून 2023 रोजी शुक्रवार रात्री ९.३० वाजता आजाद वार्ड, येथे राहणाऱ्या सुरज विजय जांभुळकर हा युवक स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळ जेवण करिता आमंत्रित केले होते. घरामध्ये महिलांचा जेवण सुरू होता. त्यामुळे सुरज व त्याचे मित्र नगरपंचायतच्या बाकावर घरा बाहेर बसून होते. यादरम्यान शेजारी राहणारा अज्जू सय्यद नावाच्या इसमाने हातात चाकू घेऊन तिथे आला व शिवीगाळ करत हातातील चाकू इथे बसलेल्या युवकांवर फिरवू लागला व विनाकारण शिवीगाळ करीत होता. तेथे उपस्थित असलेल्या युवकांनी त्याला समजण्याचा प्रयत्न केला असता त्याने सुरज विजय जांभूळकर यांच्या पोटावर चाकुरे वार करून जखमी केले.
या घटनेची माहिती पोलीस स्टेशन कुरखेडा देवून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. परंतु त्याला आद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे सदर आरोपी हा राजरोसपणे गावांमध्ये दहशत पसरवन्याचा प्रयत्न करीत आज सुद्धा तो सुरज व त्याच्या परिवारासोबत वाद घालून भांडण करीत होता. सदर आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी या मागणी करिता आज समाज बांधवांकडून हा निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर अरोपिक तात्काळ अटक करण्यात यावा अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलिस प्रशासनाला देण्यात आलेला आहे.
सदर निवेदन सादर करतांना येथील महेंद्र माने, हिरा वालदे, राजू टेंभुर्णे, रोहित ढवडे, नंदेश्वर, संतोष खोब्रागडे, विजय जांभूळकर, सूरज जांभूळकर आदी बौद्ध बांधव उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!